मुंबईतील भायखळा प्राणिसंग्रहालय म्हणून्र प्रसिद्ध असणाऱ्या वीरमाता जिजाबाई उद्यान आणि प्राणि संग्रहालयात नववर्षाच्या सुरुवातीस रविवारी(१ जानेवारी) रोजी एका दिवसातील विक्रमी १३.७८ लाख रुपयांचा महसूल गोळा झाला. या पार्श्वभूमीवर शिवसेना(ठाकरे गट) आदित्य ठाकरे यांनी पेंग्विनवरून होणाऱ्या विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले.

“राजकीय विरोधक त्यांच्या द्वेषपूर्ण विचारातून मला अनेकदा यावरून नावे ठेवतात. त्यांनी बातमी जरूर वाचा! वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील मुंबई प्राणिसंग्रहालयात उद्धव ठाकरे आणि मी मुंबई मनपाच्या माध्यमातून जे काही साध्य करण्याचा प्रयत्न केला त्याचा अभिमान आहे.” असं आदित्य ठाकरेंनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

kolhapur lok sabha seat, sanjay mandlik, sanjay mandlik controversial statement, shahu maharaj, historians criticise sanjay mandlik, shivsena, bjp, congress, lok sabha 2024, election 2024, mahayuti, maha vikas aghadi, kolhapur politics, kolhapur shahu maharaj, controversial statment on shahu maharaj,
छत्रपतींच्या गादीचा मंडलिकांकडून अवमान; इतिहास संशोधकांनी व्यक्त केला निषेध
loksatta viva Artificial Intelligence Lok Sabha Election social media
AIच्या गावात!
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”
CJI DY Chandrachud
“एवढ्याश्या कारणावरून मला ट्रोल केलं जातं…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितली व्यथा

नववर्षाच्या सुरुवात रविवाराने झाल्याने प्राणिसंग्रहालयास ३३ हजार पर्यटकांनी भेट दिली आणि हा एकदिवसीय पर्यटकांच्या संख्येतील नवा विक्रम झाला. कारण, या अगोदर ६ नोव्हेंबर रोजी ३१ हजार ८४१ पर्यटकांनी प्राणिसंग्रहलायस भेट दिली होती, तेव्हा ११.१३ लाख रुपयांचा महसूल गोळा झाला होता. पर्यटाकांची प्रचंड संख्या पाहता प्राणिसंग्रहलाय व्यवस्थापनाने मुख्य प्रवेशद्वार निर्धारित वेळेच्या म्हणजे सांयकाळी ५ वाजण्याच्या १५ मिनिटे अगोदरच बंद केले होते. कारण, प्राणिसंग्रहालयातील गर्दीचे व्यवस्थापन करणे अवघड झाले होते. अनेक पर्यटकांनी आल्या पावली मागे फिरावे लागल्याचेही दिसून आले.

नाताळनिमित्ताने मिळालेल्या सलग सुट्टय़ांमुळे बोरिवलीस्थित संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात, भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय येथे पर्यटकांची वर्दळ वाढली होती. राष्ट्रीय उद्यानातील आणि राणी बागेतील पशुपक्ष्यांना पाहून दैनंदिन थकवा विसरून पर्यटक मनमुराद आनंद लुटताना दिसून आले.

राणी बागेतही पर्यटकांची मोठी गर्दी दिसली. राणी बागेत पेंग्विन हे मुख्य आकर्षण असून, पेंग्विन कक्षाच्या बाहेर तिकिटे काढण्यासाठी पर्यटकांच्या लांबच्या लांब रांगा होत्या. नाताळच्या दिवशी राणीच्या बागेत ३१ हजारांहून अधिक पर्यटकांनी भेटी दिल्या. तर, गुरुवारीही २३ हजारांहून अधिक पर्यटकांची राणी बागेत उपस्थिती होती. त्यामुळे दररोज ७ ते ११ लाखांहून अधिक महसूल प्रशासनाला मिळल्याची माहिती आहे.

याशिवाय, पश्चिम रेल्वे मार्गावरील गर्दीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या बोरिवली स्थानकापासून सुमारे एक किमी अंतरावर राष्ट्रीय उद्यान उभे आहे. त्यामुळे नाताळच्या सुट्टय़ांमध्ये दररोज देशातील पर्यटकांसह विदेशी पर्यटकांची संख्याही मोठय़ा प्रमाणात असल्याचे दिसून आले. राष्ट्रीय उद्यानातील मुख्य आकर्षण हे सिंह सफारी असून दररोज १ हजारांहून अधिक तिकिट विकली गेली. तर एक लाखांहून अधिक महसूल राष्ट्रीय उद्यानाला मिळला.