मुंबई : सनदी लेखापाल (सीए) परीक्षेचा अंतिम निकाल सोमवारी जाहीर झाला असून नव्या अभ्यासक्रमाचे ७ हजार ७७४ तर जुन्या अभ्यासक्रमाच्या २३९१ उमेदवारांना सनद मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इन्स्टिटय़ूूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया’च्या वतीने जुलैमध्ये जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमानुसार सीए अंतिम परीक्षा आणि फाऊंडेशन परीक्षा घेण्यात आली होती. नव्या अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत मध्य प्रदेशातील नंदिनी अग्रवाल ही ८०० पैकी ६१४ गुण मिळवून देशात प्रथम आली. इंदूर येथील येथील साक्षी एरन ही (६१३ गुण) दुसरी, तर बंगळूरु येथील साक्षी बाग्रेचा (६०५ गुण) तिसरी आली आहे. जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत मंगळूरु येथील रूथ डिसेल्वा (४७२ गुण) प्रथम तर पलक्कड येथील मालविका कृष्णन (४४६ गुण) दुसरी आली आहे.

नव्या अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेसाठी पहिल्या विषय गटाच्या (ग्रुप १) परीक्षेला ४९ हजार ३५८ विद्यार्थी बसले होते, त्यातील ९९८६ विद्यार्थी (२०.२३ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. दुसऱ्या विषय गटाच्या (ग्रुप २) परीक्षेला ४२ हजार २०३ विद्यार्थी बसले असून त्यातील ७३२८ विद्यार्थी (१७.३६ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. दोन्ही विषय गटांची परीक्षा २३ हजार ९८१ विद्यार्थ्यांनी दिली असून त्यातील २ हजार ८७० (११.९७ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जुन्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या विषय गटाच्या (ग्रुप १) परीक्षेसाठी १२ हजार ५५६ विद्यार्थी बसले होते, त्यातील १ हजार ३४८ विद्यार्थी (१०.७४ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. दुसऱ्या विषय गटाची (ग्रुप २) परीक्षा १७ हजार ४४ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यातील २ हजार १९४ विद्यार्थी (१२.८७ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. दोन्ही विषय गटांची परीक्षा ३ हजार ९४९ विद्यार्थ्यांनी दिली असून त्यातील ६२ (१.५७ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ca final exam results announced akp
First published on: 14-09-2021 at 00:01 IST