कॅन्सर निर्मूलनाचे कार्य करणाऱ्यांना पुरस्कार

कॅन्सर निर्मूलनासाठी काम करणाऱ्या ‘कॅन्सर एड अ‍ॅण्ड रिसर्च फाऊंडेशनतर्फे’ कॅन्सर उच्चाटनासाठी

कॅन्सर निर्मूलनासाठी काम करणाऱ्या ‘कॅन्सर एड अ‍ॅण्ड रिसर्च फाऊंडेशनतर्फे’ कॅन्सर उच्चाटनासाठी काम करणाऱ्या डॉक्टर व सामाजिक कार्यकर्त्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त एस. जयकुमार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कॅन्सर एड अ‍ॅण्ड रिसर्च फाऊंडेशन २००१ पासून गरजू कॅन्सर पीडितांना मोफत औषध सेवा मिळवून देण्याचे कार्य करत असून यंदा कॅन्सर उच्चाटनासाठी काम करणाऱ्यांचा संस्थेतर्फे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
जसलोक हॉस्पिटल व संशोधन केंद्रातील कर्करोग विभागाचे संचालक डॉ. सुरेश अडवाणी यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन तर डॉ. वाणी परमार यांना कॅन्सर क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. मेरी गोरेटी झालेक्झो यांचाही गौरव करण्यात आला. गरजू कर्करोग पीडितांना मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cancer aid and research foundation cancer social worker

ताज्या बातम्या