मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आठवड्या अखेरीच्या सुट्टीचे औचित्य साधून शनिवारपासून मतदारांच्या भेटी-गाठी घेत प्रचाराला औपचारिकरित्या सुरूवात केली.

हेही वाचा >>> “इतका घाणेरडा महाराष्ट्र आजपर्यंत मी पाहिलेला नाही,” राज ठाकरे संतापले; म्हणाले “आमच्या माणसांनी…”

MP Sanjay Singh says it is time to say goodbye to BJP
खासदार संजयसिंग म्हणतात, ‘भाजपला निरोप देण्याची वेळ’
narendra modi
प्रचार संपल्यानंतर मोदींचे रालोआ उमेदवारांना पत्र
in Gadchiroli charmoshi taluka s Villagers Oppose Land Acquisition for Iron Project BJP Faces Backlash in Lok Sabha Campaign
भूसंपादनावरून संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई , प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांनाही परत पाठवले
bachchu kadu navneet rana
“१७ रुपयांची साडी वाटून…”, बच्चू कडूंचा नवनीत राणांवर हल्लाबोल; महायुतीतलं वातावरण तापलं

सध्या गाजत असलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीसाठी एकूण २५ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. मात्र खरी लढत लटके आणि पटेल यांच्यात होणार आहे. या दोन्ही उमेदवारांकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे. या दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरले. प्रचारासाठी उमेदवारांना जेमतेम पंधरवडा मिळणार आहे. त्यातच दिवाळी, सणासुदीत गुंतलेले मतदार, कार्यकर्ते यांमुळे मोजक्या वेळेत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान उमेदवारांसमोर आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दोन्ही प्रमुख उमेदवारांनी प्रचारास दणक्यात सुरूवात केली आहे. सध्या घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेणे, जुने कार्यकर्ते, वर्षानुवर्षाचे हक्काचे मतदार, सोसायट्या येथे भेट देणे यांपासून सुरू झालेला प्रचार सोमवारपासून अधिक वेगवान होणार आहे.

हेही वाचा >>> शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद होत आहेत का? पत्रकाराच्या प्रश्नावर शरद पवारांची दोन वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले, “मी तर…”

लटके यांनी रविवारी त्यांनी नवपाडा परिसरात प्रचार केला. पिंपळेश्वर हनुमान मंदिरापासून प्रचाराला सुरुवात झाली. घरोघरी जाऊन त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी त्यांच्याबरोबर पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता या प्रचारात पुढे ठाकरे गटाचे आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते सहभागी होण्याची शक्यता आहे. पटेल यांच्याकडूनही प्रचार सुरू आहे. मात्र पटेल यांच्या अर्जावर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. पालिकेने पटेल यांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यावर बंदी घातल्याचा हा आक्षेप आहे. पटेल यांची उमेदवारी कायम राहिल्यास त्या प्रचारातही भाजपचे वरिष्ठ नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.