scorecardresearch

Premium

१०० हून जास्त कामगार असल्यास उपाहारगृह बंधनकारक; नव्या कामगार नियमांना मान्यता

शंभरपेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्यांमध्ये उपाहारगृह आणि ५० पेक्षा अधिक कामगारांची संख्या असलेल्या कारखान्यांमध्ये महिला कामगारांसाठी पाळणाघराची सुविधा आता बंधनकारक आहे.

canteen workers
१०० हून जास्त कामगार असल्यास उपाहारगृह बंधनकारक

मुंबई : शंभरपेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्यांमध्ये उपाहारगृह आणि ५० पेक्षा अधिक कामगारांची संख्या असलेल्या कारखान्यांमध्ये महिला कामगारांसाठी पाळणाघराची सुविधा आता बंधनकारक आहे. यासंदर्भातील चौथ्या कामगार संहितेच्या नवीन नियमांना राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली.

केंद्र शासनाने २९ कामगार कायदे एकत्र करून चार कामगार संहिता तयार केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कामगारांची व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता २०२० या चौथ्या संहितेस मान्यता देण्यात आली. नव्या संहितेच्या नियमानुसार राज्यात यापुढे १०० पेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यांमध्ये उपाहारगृहाची तसेच ५० पेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यात पाळणाघराची व्यवस्था बंधनकारक राहणार आहे. २५० पेक्षा जास्त कामगार संख्या असलेल्या कारखान्यात कल्याण अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागणार आहे.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
hunger strike, Rohit Patil, Health deteriorated, sangli
उपोषण सुरु करताच रोहित पाटलांची प्रकृती खालावली

यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाने वेतन संहिता, औद्योगिक संबंध संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता, या तीन संहितांच्या नियमांना मान्यता दिली आहे.
केंद्र सरकारने १९९९ मध्ये माजी केंद्रीय कामगार मंत्री रिवद्र वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा श्रम आयोग नेमला होता. या आयोगाने सर्व २९ कामगार कायदे एकत्रित करुन चार कामगार संहिता तयार करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने चार कामगार संहिता तयार केल्या आहेत. कामगार हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट असल्याने केंद्र शासनाने सर्व राज्यांसाठी एकत्रित संहिता तयार केली आहे. सर्व संहितांची अंमलबजावणी सर्व राज्यांमध्ये एकत्रितरित्या करावयाची असल्याने राज्यांनी संबंधित संहितांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने नियम मंजूर करणे आवश्यक आहे. त्यानुसार केंद्र शासनाने व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता अधिनियम, २०२० मध्ये प्रसिध्द केले आहेत. या अधिनियमात व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता तयार करण्याचे अधिकार राज्यांना देण्यात आले आहेत. यानुसारच संहितेस राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Canteen is compulsory if there are more than 100 workers amy

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×