मुंबईच्या समुद्रात शनिवारी १४ मे रोजी एक मालवाहू नौका बुडाल्याची घटना घडली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे मालवाहू नौकेमध्ये माल भरण्यात आला होता. त्यानंतर यातील माल मोठ्या जहाजात भरण्यात येणार होता. मात्र माल भरण्याची प्रक्रिया पूर्ण होताच या नौकेत अचानक पाणी शिरू लागले आणि हळू हळू नौका पाण्याखाली जाऊ लागली. घडत असलेला प्रकार पाहता नौकेतील तिघांनी भीतीपोटी समुद्रात उडी मारली.

“मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे मालवाहू बोटीमध्ये माल भरण्यात आला. त्यानंतर, बोट जवळच्या बॅलार्ड पिअरवर गेली आणि साठा उतरवून तेथे एका मोठ्या जहाजात भरण्यात आला. माल उतरवण्याची प्रक्रिया संपताच या मालवाहू बोटीत पाणी शिरू लागले आणि बोटीतील तीन जणांनी भीतीपोटी समुद्रात उडी मारली,” असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Viral Video : स्कुटी आणि बाईकची झाली टक्कर, नंतर तरुणाने मुलीसोबत जे केले ते पाहून तुम्हालाही येईल राग

अवघ्या पाच वर्षांच्या मुलीनं बाळाला दिला होता जन्म; घटना वाचून थक्क व्हाल

दरम्यान, दुसऱ्या बोटीतील कर्मचाऱ्यांनी या तिघांनाही वाचवले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मुंबईच्या बॅलार्ड पिअरजवळ ही घटना घडली. वाचवण्यात आलेले तिघेही तेथील स्थानिक रहिवासी असून त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार नौकेच्या इंजिनामध्ये बिघाड झाल्यामुळे हा प्रकार झाल्याचे निष्पन्न झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.