३८ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात छोटा राजन निर्दोष

दोन पोलिसांनी राजनला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने चाकूने त्यांच्यावर हल्ला केला होता.

मुंबई : अडतीस वर्षांपूर्वी दोन पोलिसांना मारहाण करून त्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपांतून कुख्यात गुंड छोटा राजन याची विशेष न्यायालयाने गुंड छोटा राजन याची पुराव्यांअभावी निर्दोष ठरवले.

हत्येचा प्रयत्न करणे, सरकार कर्मचाऱ्याला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त करण्याच्या आरोपाअंतर्गत राजनवर खटला चालवण्यात आला.  मात्र खटल्याशी संबंधित बहुतांश साक्षीदारांचा ठावठिकाणा सापडत नसल्याचा तसेच प्रकरणाची कागदपत्रेही गहाळ झाल्याचे तपास अधिकाऱ्याने न्यायालयाला सांगितले. तसेच प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा अहवाल न्यायालयात सादर केला. परंतु न्यायालयाने तपास पुढे सुरू ठेवण्याचे आदेश सीबीआयला दिले होते. परंतु साक्षीदार सापडत नसल्याचे सीबीआयकडून न्यायालयाला सांगण्यात आले. या पाश्र्वभूमीवर विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी राजनला त्याच्यावरील या सगळ्या आरोपांतून पुराव्याअभावी निर्दोष  ठरवले.  या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून होता. राजनच्या अटकेनंतर तपास सीबीआयकडे वर्ग झाला. १९८३ मधील हे प्रकरण आहे. घाटकोपर येथे पोलिसांनी एका टॅक्सीला थांबवले. या टॅक्सीतून राजन साथीदारांसोबत मद्याची तस्करी करत असल्याचे उघड झाले. दोन पोलिसांनी राजनला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने चाकूने त्यांच्यावर हल्ला केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cbi court acquitted chhota rajan in 38 year old case zws

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या