मुंबई : राफेल विमान घोटाळा दडपण्यासाठीच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) तत्कालीन संचालक अलोक वर्मा यांना मध्यरात्री पदावरून हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय नागेश्वर राव यांची पदावर नियुक्ती करण्यात आली होती, असा आरोप अ. भा. काँग्रेसचे प्रवक्ते  पवन खेरा यांनी गुरुवारी केला.

राफे ल विमान घोटाळ्यात पंतप्रधान मोदी यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने राष्ट्रीय सुरक्षेशी समझोता के ला. तसेच या व्यवहारातून देशाच्या तिजोरीवर हजारो कोटींचा बोजा पडल्याचे खेरा यांनी मुंबई काँग्रेस कार्यालयातील पत्रकार परिषदेत सांगितले.

या वेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणजितसिंग सप्रा हे उपस्थित होते. राफे ल विमान खरेदीवरून मोदी किंवा भाजपने हात झटकण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही या व्यवहारात भाजप व मोदींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ केल्याचा आरोपही खेरा यांनी के ला.

या व्यवहारात सुशान गुप्ता या दलालाचे नाव पुढे आले आहे. या गुप्ताची चौकशी का केली जात नाही, असा सवालही त्यांनी के ला.

इंधन दरवाढीच्या विरोधात येत्या रविवारी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून मुंबई दादरच्या राजगृह ते चैत्यभूमी अशी पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती भाई जगताप यांनी दिली.