Former Chairman of Tata Sons Died in Car Accident in Mumbai: ‘टाटा सन्स’चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्याने उद्योगविश्वाला मोठा धक्का बसला आहे. सायरस मिस्त्री हे पंडोल कुटुंबियांसह अहमदाबादहून मुंबईकडे मर्सिडीज कारने येत होते. चारोटी नाक्याजवळील सूर्या नदीच्या पुलाच्या कठडय़ाला त्यांच्या भरधाव कारची धडक बसल्याने मागील आसनावर बसलेल्या मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी सायरस मिस्त्री यांची कार सीसीटीव्हीत कैद झाली होती. हे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे.

Cyrus Mistry Death: टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन, पालघरमध्ये अपघातात ओढवला मृत्यू

Kevin Pietersen Shares Experience of flight while Iran Attacks Israel
IPL 2024: इराणच्या इस्रायलवरील हल्ल्याबाबत केविन पीटरसनची पोस्ट चर्चेत; अनुभव मांडताना म्हणाला, “त्यांची क्षेपणास्त्रं चुकवण्यासाठी…”
Somalias Pirates Stock Market in Harardhere
वित्तरंजन : भांडवली बाजारच; पण कुणाचा?
two women fighting for seats in Delhi bus shocking video goes viral on social media
‘सीट’वरून दोन महिलांमध्ये तुफान राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, VIDEO होतोय व्हायरल
loksatta analysis india fights somali pirates indian navy rescues ship from somali pirate attack
विश्लेषण: हुथींपाठोपाठ आता सोमाली चाच्यांचा उच्छाद… भारतीय नौदलाची भूमिका कशी ठरणार निर्णायक?

रविवारी भीषण अपघातात सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्यासह प्रवास करणारे जहांगीर दिनशा पंडोल यांचाही मृत्यू झाला, तर इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. राज्य सरकारने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

PHOTOS: सूर्या नदी, पूल अन् दुभाजक, सायरस मिस्त्री यांचा अपघात नेमका कसा झाला? फोटोंच्या माध्यमातून समजून घ्या

सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार अपघाताच्या काही वेळापूर्वी चेकपॉइंटच्या दिशेने जात असल्याचं दिसत आहे. यानंतर काही वेळातच सूर्या नदीच्या पुलावर कठड्याला धडक देऊन कारचा अपघात झाला.

सीट बेल्ट न लावणं पडलं महागात

सायरस मिस्त्री यांनी सीट बेल्ट लावला नसल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन अपघातस्थळीच त्यांचा मृत्यू झाला. कार पुलाच्या कठडय़ाला धडकताच मोटारीतील संरक्षक ‘एअर बॅग’ उघडल्या, मात्र मिस्त्री आणि जहांगीर आसनावरून फेकले गेल्याने यांचे संरक्षण होऊ शकले नाही, असे सांगण्यात येते.

सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर आनंद महिंद्रांनी घेतली शपथ; म्हणाले “यापुढे मी कधीच…”

हा अपघात कसा झाला यासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली असून या अपघाताला अती वेग कारणीभूत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. अपघात झाला तेव्हा गाडी फार वेगात होती असं सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाडी पुलावर आली तेव्हा ती निर्धारित वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने धावत होती. तसेच गाडीच्या वेगाचा अंदाज चालकाला न आल्याने हा अपघात झाल्याचंही पोलिसांनी म्हटल्याचं पीटीआयने ट्वीट केलं आहे.

चालकाला चकवा…

तिसरी महत्त्वाची गोष्ट ठरली ती म्हणजे अपघात झालेलं ठिकाण. मुंबई-अहमदाबाद या सहापदरी महामार्गाचा अजूनही काही भाग चौपदरीच आहे. अपघाताच्या ठिकाणी तीनपदरी रस्ता निमुळता होत पुलावर दुपदरी होतो. परंतु याबाबतचा सूचना फलक लावला नसल्याने चालकाला चकवा देणाऱ्या या रस्त्याचा अंदाज येत नाही. मिस्त्री यांच्या चालकालाही या चकव्याचा अंदाज न आल्याने मोटार पुलाच्या कठड्यावर आदळली, असे सांगण्यात आले.

नम्र, उमदा आणि तेजस्वी उद्योगपती हरपला

मितभाषी असलेल्या मिस्त्री यांच्याकडे २०१२मध्ये ‘टाटा सन्स’चे अध्यक्षपद आले. त्यानंतरच ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले. नावात ‘टाटा’ नसलेले ते टाटा समूहाचे दुसरे अध्यक्ष बनले. त्यांना रतन टाटा यांचे वारस म्हणून घोषित करण्यात आले. परंतु, केवळ चार वर्षांच्या कालावधीत मिस्त्री यांना टाटा समूहातून पायउतार व्हावे लागले. पुढे सन्मानासाठी त्यांनी दीर्घकाळ न्यायालयीन लढा दिला. त्यात त्यांना अपयश आले. त्याआधी ते कुटुंबाच्या मालकीच्या बांधकाम व्यवसायात म्हणजे शापूरजी पालनजी अँड कंपनीत १९९१ मध्येच, म्हणजे वयाच्या २३व्या वर्षी संचालक बनले. तीन वर्षांनी ते व्यवस्थापकीय संचालक बनले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने झपाटय़ाने यशाचे शिखर गाठले.

मिस्त्री यांच्या अकाली निधनामुळे एक नम्र, उमदा आणि तेजस्वी उद्योगपती हरपला असून उद्योग जगताची अपरिमित अशी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.