मुंबईत वांद्रे-वरळी सी-लिंकवर झालेल्या भीषण अपघातात पाचजणांचा मृत्यू झाला असून, १० जण जखमी झाले आहेत. चार वाहनं आणि रुग्णवाहिकमध्ये धडक होऊन हा भीषण अपघात झाला. जखमींना उपचारासाठी नायर, सैफी, लिलावती ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील दोघांना उपचार करून घरी पाठवण्यात आले असून उर्वरित जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Bandra-Worli Sea Link Accident: जखमींना नेण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेलाच गाड्यांची धडक, वाहनांचा अक्षरश: चुराडा, पाचजणांचा मृत्यू

tankers, Tanker inspection drive,
टॅंकरच्या बेदरकारपणाला आवर, अपघात दुर्घटनेनंतर वाहतूक विभागाकडून टॅंकर तपासणी मोहीम
Two houses destroyed, cylinder explosion,
देव तारी त्याला कोण मारी… सिलिंडरच्या स्फोटात दोन घर खाक, तान्हुले बाळ बचावले
Girl Dies After Eating Cake
१० व्या वाढदिवशी खाल्लेल्या केकने चिमुकलीचा मृत्यू, झोमॅटोची हॉटेलवर कारवाई; कुटुंबाने सांगितलं पूर्ण प्रकरण
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या

हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्हीत वेगाने येणारी कार रुग्णवाहिकेला धडक देत असल्याचं दिसत आहे. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चुराडा झाला.

पाहा अपघाताचं सीसीटीव्ही

कसा झाला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, सी-लिंकवर एका कारचा अपघात झाला होता. यावेळी जखमींना नेण्यासाठी रुग्णवाहिका पोहोचली होती. पण याचवेळी तेथून जाणाऱ्या गाड्यांनी अपघातग्रस्त वाहनासह रुग्णवाहिकेलाही धडक दिली. यानंतर सी-लिंकवर एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही व्यक्त केला शोक

अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.

पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत.