VIDEO: रात्रीची वेळ, रुग्णवाहिका अन् वेगाने आलेली कार; वांद्रे-वरळी सी लिंकवरील भीषण अपघात कॅमेऱ्यात कैद, मोदींनीही व्यक्त केला शोक | CCTV of Accident on Bandra Worli Sea Link sgy 87 | Loksatta

CCTV: रात्रीची वेळ, रुग्णवाहिका अन् वेगाने आलेली कार; वांद्रे-वरळी सी लिंकवरील भीषण अपघात कॅमेऱ्यात कैद, मोदींनीही व्यक्त केला शोक

मुंबईत वांद्रे-वरळी सी-लिंकवर झालेल्या भीषण अपघातात पाचजणांचा मृत्यू, १० जण जखमी

CCTV: रात्रीची वेळ, रुग्णवाहिका अन् वेगाने आलेली कार; वांद्रे-वरळी सी लिंकवरील भीषण अपघात कॅमेऱ्यात कैद, मोदींनीही व्यक्त केला शोक
मुंबईत वांद्रे-वरळी सी-लिंकवर झालेल्या भीषण अपघातात पाचजणांचा मृत्यू, १० जण जखमी

मुंबईत वांद्रे-वरळी सी-लिंकवर झालेल्या भीषण अपघातात पाचजणांचा मृत्यू झाला असून, १० जण जखमी झाले आहेत. चार वाहनं आणि रुग्णवाहिकमध्ये धडक होऊन हा भीषण अपघात झाला. जखमींना उपचारासाठी नायर, सैफी, लिलावती ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील दोघांना उपचार करून घरी पाठवण्यात आले असून उर्वरित जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Bandra-Worli Sea Link Accident: जखमींना नेण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेलाच गाड्यांची धडक, वाहनांचा अक्षरश: चुराडा, पाचजणांचा मृत्यू

हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्हीत वेगाने येणारी कार रुग्णवाहिकेला धडक देत असल्याचं दिसत आहे. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चुराडा झाला.

पाहा अपघाताचं सीसीटीव्ही

कसा झाला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, सी-लिंकवर एका कारचा अपघात झाला होता. यावेळी जखमींना नेण्यासाठी रुग्णवाहिका पोहोचली होती. पण याचवेळी तेथून जाणाऱ्या गाड्यांनी अपघातग्रस्त वाहनासह रुग्णवाहिकेलाही धडक दिली. यानंतर सी-लिंकवर एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही व्यक्त केला शोक

अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.

पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“तुमच्या दसरा मेळाव्यातील भाषणासाठी काही मुद्दे…”, भाजपाचा उद्धव ठाकरेंना खोचक सल्ला; भाषणावरून लगावला टोला!

संबंधित बातम्या

विश्लेषण: डोंगर आणि तलावाखालून जाणारा मुंबई-पुणे द्रुतगती बोगदा कसा आहे? त्याचा फायदा काय होईल?
मुंबई विमानतळावर ‘सर्व्हर डाऊन’, प्रवाशांच्या लांबच लांब रांगा
अमेरिकी नोकऱ्या गमावल्याने भारतीय इंजिनीअर्सचे विवाह अडचणीत
कर्म तैसे फळ! मोराच्या अंड्यांची चोरी करायला गेलेल्या चोराला घडली जन्माची अद्दल; पाहा Viral Video
Video: आधी डोक्यावरून हात फिरवला, मग मिठी मारली; माकडाच्या या कृतीवर मांजरीने काय केले एकदा पाहाच

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“MPSC त उत्तीर्ण नाही झाला तरी गावाकडे…”, गोपीचंद पडळकरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला
पुण्यातून व्यापाऱ्याचे अपहरण करणारा आरोपी राजस्थानमध्ये जेरबंद; प्रेमसंबंधातून अपहरणाचा प्रकार
शाहरुख खानने दिली मक्का मशिदीला भेट, प्रार्थना करतानाचे फोटो व्हायरल; कारण आहे एकदम खास
PAK vs ENG: पाकिस्तानी गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या, रावळपिंडी कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने केले सात विश्वविक्रम
पुणे: कात्रज प्राणी संग्रहालयातील गव्याचा मृत्यू