मुंबई : मुंबईला शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी भांडुप येथे असलेल्या जलप्रक्रिया केंद्रावर आणि तुळशी तलाव येथील जलप्रक्रिया केंद्रावर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा लावण्यात येणार आहे. पालिका त्याकरिता सुमारे पाच कोटी रुपये खर्च करणार आहे. भांडुप संकुल येथील नवीन जलप्रक्रिया केंद्रातून मुंबईला दरदिवशी ९०० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : नोटाबंदीचा निर्णय घटनाबाह्य नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

Rats in operating theaters of V N Desai Hospital
व्ही. एन. देसाई रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहांमध्ये उंदरांचा सुळसुळाट
Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?
Urgent inspection of hospitals
देशभरातील रुग्णालयांची तातडीने तपासणी मोहीम; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उचलले पाऊल

हे जलप्रक्रिया केंद्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात आहे. अविरत पाणी पुरवठ्याच्यादृष्टीने हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील आहे. याठिकाणी उदंचन केंद्र, विद्युत उपकेंद्र, पूर्व प्रक्रिया केंद्र, गाळ पुनर्भिसरण यंत्रणा असे विविध विभाग आहेत. त्यामुळे जलप्रक्रिया केंद्राची सुरक्षितता अत्यंत गरजेची आहे. या केंद्राची नुकतीच मुलुंड येथील पोलिसांनी महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणेसोबत जाऊन पाहणी केली होती. त्यावेळी या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे गरजेचे असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले होते.

हेही वाचा >>> निवासी डॉक्टरांचा संप सुरू

तसेच भांडुप जलप्रक्रिया केंद्रापासून ४.५ किमी अंतरावर तुळशी जलप्रक्रिया केंद्र आहे. याठिकाणी संदेश वहनाचे आदान प्रदान दूरध्वनी व बिनतारी संदेश वहन प्रणालीमार्फत होते. त्यामुळे या परिसरातही इलेक्ट्रॉनिक टेहळणी यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यामुळे तुळशी तलाव व तुळशी जलप्रक्रिया केंद्र येथील हालचाली भांडुप जलप्रक्रिया केंद्रातील सर्व्हर खोलीमध्ये अहोरात्र दिसतील. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसइफ) आणि मुंबई पोलीस यांनी दिलेल्या सुरक्षा विषयक अहवालानुसार ही यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. त्यासाठी ४ कोटी ७९ हजार रुपये खर्च येणार आहे. सर्व करांसह हा खर्च ४ कोटी ९८ लाखांवर जाणार आहे.