घाटकोपरमध्ये बुधवारी एक विचित्र अपघात घडला. एका भरधाव वेगात आलेल्या कारने तीन वाहनांना धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात सातजण जखमी झाले. या धक्कादायक अपघाताचा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्यांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी पंतनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे मोबाईल चार्ज करण्याच्या नादात हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घाटकोपरमधील सुधा पार्क परिसरात बुधवारी दुपारी दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. कामराज नगर परिसरात राहणारा राजू यादव नावाचा रिक्षाचालक त्याच्या मित्रासोबत कारमध्ये बसला होता. मोबाइल चार्ज करण्यासाठी त्याने कारची चावी फिरवली आणि अचानक कार सुरू झाली. त्याने ब्रेकऐवजी एस्कलेटरवर पाय दिल्याने कारने वेग घेतला. त्यानंतर कार समोर उभ्या असणाऱ्या तीन रिक्षा आणि रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीला धडकली. रस्त्यावरून जाणाऱ्या काही पादचाऱ्यांनाही या कारने धडक दिली. हा सारा धक्कादायक घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दुपारी १२ वाजून ४२ मिनिटांचं सीसीटीव्ही समोर आलं आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ नेमकं घडलं काय…

CCTV Video Ghatkopar Car Accident:

या अपघातात एका शालेय विद्यार्थीसह एकूण सातजण जखमी झाले. आदित्य सनगरे (९), वैष्णवी काळे (१६), राजेंद्र बिंद (४९), सपना सनगरे (३५), जयराम यादव (४६), श्रध्दा सुशविरकर (१७) आणि भरतभाई शहा (६५) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना स्थानिक रहिवाशांनी राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल केले. सर्वांची प्रकृती स्थिर असून पंतनगर पोलिसांनी कार चालक राजू यादवविरूद्ध (४२) गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cctv video of ghatkopar freak car accident 7 injured scsg
First published on: 22-09-2022 at 10:34 IST