मुंबई: दहिसर ते मीरारोड मेट्रो ९ मार्गिकेतील मिरागाव मेट्रो स्थानकाच्या कामादरम्यान बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एक दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सिमेंट मिक्सर ऑपरेटरचा मृत्यू झाला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडी) कंत्राटदार जे. कुमारला ३० लाखांचा दंड ठोठावला आहे. तर सल्लागार कंपनीला १० लाखांचा दंड आकारला आहे. त्याचवेळी मृताच्या नातेवाईकांना तातडीने दोन लाखांची मदत दिली असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र चौकशी समितीची स्थापन केली आहे. या समितीच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

एमएमआरडीएकडून मेट्रो ९ चे काम सुरु आहे. बुधवारी रात्री साडेदहा वाजता मिरागाव मेट्रो स्थानकातील आव्हानात्मक काम सुरु होते. या कामादरम्यान सिमेंट मिक्सर बाजूच्याच खोदलेल्या एका खड्ड्यात पडला. कंत्राटदार आणि एमएमआरडीएकडून तात्काळ बचावकार्य सुरु करत ऑपरेटरला बाहेर काढले. या दुर्घटनेत सिमेंट मिक्सर ऑपरेटर गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी कंत्राटदार जे. कुमारला १० लाख रुपये तर सल्लागार मे. सिस्ट्रा कन्सोर्टियम कंपनीला १० लाखांचा दंड ठोठावला आहे. प्रत्येक प्रकल्पाच्या कामादरम्यान शून्य अपघाताचे धोरण निश्चित करत या धोरणाच्या कठोर अंमलबजाणीचे निर्देश सर्व कंत्राटदारांना दिले आहेत. असे असताना या प्रकल्पात ही दुर्घटना घडल्याने कंत्राटदार आणि सल्लागाराविरोधात तातडीने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या अहवालानंतर दोषींविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे.

Stunts by bikers kill young man in road accidnet
दुचाकीस्वारांच्या स्टंटबाजीने घेतला रस्त्यावरील तरुणाचा बळी
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Beed Sarpanch Death by accident
Beed Sarpanch Death: सरपंचाच्या मृत्यूमुळं बीड पुन्हा हादरलं; राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनानं चिरडलं, आमदार सुरेश धसांनी व्यक्त केला संशय
worker dies after falling from terrace case registered against contractor for negligence
गच्चीवरुन पडल्याने कामगाराचा मृत्यू; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल
Karnataka
Karnataka : संगणक ऑपरेटरची एक चूक अन् जिवंत व्यक्तीला दाखवलं मृत; मदतीसाठी व्यक्तीची आयएएस अधिकाऱ्यांकडे धाव; नेमकं काय घडलं?
One person died, eight injured , vehicle fell in valley,
ठाणे : वाहन दरीत कोसळून एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी
Attempted of assassination plot iron strip railway track Atgaon Tanshet railway stations
आटगाव-तानशेत रेल्वे स्थानकांदरम्यान रूळावर लोखंडी पट्टी ठेऊन घातपाताचा प्रयत्न
person has died in an accident on Shiv Panvel road
विचित्र अपघात एक ठार

हेही वाचा – मेट्रो स्थानकांतील स्वच्छता सुधारणांसाठी ‘ॲप’ प्रवाशांच्या सूचना, तक्रारी जाणून घेण्यासाठी ‘एमएमएमओपीएल’चा पुढाकार

हेही वाचा – मुबलक पाण्याची प्रतीक्षाच! सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे ९० टक्के काम पूर्ण

मृताच्या नातेवाईकांना तात्काळ दोन लाखांची मदत करण्यात आली आहे. कामगार भरपाई कायदा तसेच इमारत आणि बांधकाम कायद्याअंतर्गत आवश्यक ती मदतही नातेवाईकांना केली जाणार आहे. तर अशा दुर्घटना घडू नये यासाठी प्रकल्पस्थळी अत्यावश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश मुखर्जी यांनी कंत्राटदारास दिले आहेत. खड्ड्याचा भाग बॅरिकेट्स आणि हिरव्या जाळ्या लावून सुरक्षित करण्यात आला आहे. दरम्यान कामादरम्यान अनेकदा मोठे अपघात घडले असून त्यात कामगारांना जीव गमवावा लागला आहे. तर अनेकदा कामात हलगर्जी केल्याचा ठपकाही जे. कुमारवर लावण्यात आला आहे. या प्रकरणी मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. मात्र यानंतरही या कंपनीच्या कामादरम्यान दुर्घटनेची आणि कामगारांच्या मृत्यूची मालिका सुरुच आहे.

Story img Loader