scorecardresearch

अत्याचारग्रस्त महिलांच्या मदतीसाठी ३०० केंद्रे

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने पश्चिम विभागातील राज्यांच्या मुंबईत आयोजित केलेल्या क्षेत्रीय परिषदेत बोलताना इराणी म्हणाल्या, महिलांसाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत यंदा १४ टक्के वाढ करण्यात आली आहे.

Women protection shakti law maharashtra in marathi

मुंबई : महिला व लहान मुलांसाठीच्या विविध योजनांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात १.७१ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून अत्याचारग्रस्त महिलांच्या मदतीसाठी ३०० नवीन केंद्रे (वन स्टॉप सेंटर) सुरू करण्यात येणार असल्याचे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी मंगळवारी येथे सांगितले.

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने पश्चिम विभागातील राज्यांच्या मुंबईत आयोजित केलेल्या क्षेत्रीय परिषदेत बोलताना इराणी म्हणाल्या, महिलांसाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत यंदा १४ टक्के वाढ करण्यात आली आहे. महिला व मुलींची कुचंबणा होवू नये, यासाठी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ११ लाखांहून अधिक शौचालये तर चार लाखांहून अधिक सरकारी शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. आयुष्यमान भारत योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून त्यात ४५ कोटी महिलांचा समावेश आहे. देशात महिलांसाठी सध्या ७०४ मदत केंद्रे हेल्पलाईनच्या माध्यमातून कार्यरत आहेत. देशातील सुमारे ७० लाख महिलांना या केंद्रांच्या माध्यमातून मदत पुरविण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Centers help oppressed women small children plans ysh

ताज्या बातम्या