मुंबई : मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातील रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर यांच्या देखभाल-दुरूस्तीसाठी रविवारी मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी – विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

मुख्य मार्गिका

कुठे : सीएसएमटी – विद्याविहार स्थानकांदरम्यान अप – डाऊन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी १०.५५ पासून दुपारी ३.५५ पर्यंत

परिणाम : या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल सेवा सीएसएमटी – विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील व पुढे विद्याविहार येथे पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल विद्याविहार – सीएसएमटीदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.

या ब्लॉकमुळे सीएसएमटीकडे येणाऱ्या आणि सीएसएमटीवरून जाणाऱ्या लोकल मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड येथे थांबणार नाहीत.

हार्बर रेल्वे

कुठे : सीएसएमटी – चुनाभट्टी/वांद्रे अप – डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.१० पासून दुपारी ४.१० पर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी / वडाळा येथून वाशी / बेलापूर / पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. तसेच वांद्रे / गोरेगाव येथून सीएसएमटीकडे येणाऱ्या डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत.

पनवेल / बेलापूर / वाशी येथून सीएसएमटीकडे येणाऱ्या अप सेवा; तसेच गोरेगाव / वांद्रे येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप लोकल सेवा देखील बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (फलाट क्रमांक ८) दरम्यान विशेष लोकल सुमारे २० मिनिटांच्या अंतराने चालवण्यात येतील.