मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या धीम्या ट्रॅकवर विक्रोळीजवळ लोकल बंद पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ठाण्याहून सीएसटीकडे लोकल बंद पडल्याने धीम्या ट्रॅकवरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. यानंतर धीम्या ट्रॅकवरील लोकल फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आल्या. विक्रोळीजवळ बंद पडलेली लोकल साडेसातच्या सुमारास हटवण्यात आली असली तरी वाहतूक २० मिनिटे उशिराने सुरू आहे. त्यामुळे कामासाठी निघालेल्या लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. बहुसंख्य लोकांची कार्यालये सीएसटीच्या दिशेला असल्याने आणि नेमकी याच दिशेला जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाल्याने लोकांच्या दिवसाची सुरुवातच मनस्तापाने झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway affected due to unit defect
First published on: 05-01-2017 at 07:41 IST