scorecardresearch

मुंबई : बॅनरमुळे मध्य रेल्वे विस्कळीत

ओव्हरहेड वायरवर बॅनर पडल्याने मध्य रेल्वे उपनगरीय डाउन मार्गावर धावणाऱ्या धीम्या लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले.

मुंबई : बॅनरमुळे मध्य रेल्वे विस्कळीत
( ओव्हरहेड वायरवर बॅनर पडल्याने मध्य रेल्वे उपनगरीय डाउन मार्गावर धावणाऱ्या धीम्या लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले )

ओव्हरहेड वायरवर बॅनर पडल्याने मध्य रेल्वे उपनगरीय डाउन मार्गावर धावणाऱ्या धीम्या लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले. सकाळी ११ च्या सुमारास ही घडना घडली. ओव्हरहेड वायवरून बॅनर काढण्यासाठी २५ मिनिटे लागली आणि त्यानंतर लोकल सेवा सुरळीत झाली. मात्र त्यानंतरही लोकल विलंबाना धावत होत्या.

सकाळी 1१०.५८ च्या सुमारास मशीद बंदर आणि सॅण्डहर्स्ट रोड स्थानकादरम्यान कल्याण दिशेला धीम्या मार्गांवर ओव्हरहेड वायरवर एक बॅनर पडला. हा बॅनर खूप मोठा होता. तसेच ओव्हरहेड वायरवर पडल्याने तांत्रिक समस्या उद्भवली. बॅनर काढण्यासाठी ओव्हरहेड वायरचा विद्युतपुरवठा बंद करण्यात आला. तसेच डाउन मार्गावरून जाणाऱ्या लोकलही थांबविण्यात आल्या.

अखेर बॅनर काढून लोकल सेवा पूर्ववत करण्यासाठी सकाळी ११.२३ वाजले. मात्र त्यानंतरही कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल १० मिनिटे विलंबाने धावत होत्या.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Central railway disrupted due to banners mumbai print news amy