लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मध्य रेल्वेवरील लातूर-सीएसएमटी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सोमवारी सकाळच्या सुमारास मध्य रेल्वेच्या लोकल सेवेला मोठा फटका बसला. जलद लोकल सेवांवर परिणाम झाला. यामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचण्यास खूप उशीर झाला.

Raj thackeray on Baba Siddique
Raj Thackeray : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “बाहेरच्या राज्यातून…”
Baba Siddique murder in Mumbai
Baba Siddique : “बाबा सिद्दीकींची हत्या म्हणजे काँट्रॅक्ट…
3190 crores will be spent for mechanical cleaning in health department hospitals
आरोग्य विभागाच्या रुग्णालयांत यांत्रिकी सफाईसाठी ३१९० कोटी होणार खर्च!
Raj thackeray on sharad pawar
Raj Thackeray : “शरद पवार नास्तिक आहेत, असं सांगितल्यानंतर ते प्रत्येक मंदिरात…”, राज ठाकरेंची टीका; म्हणाले…
Lawrence Bishnoi gang takes Baba Siddique murder responsibility
Baba Siddique Murder: “हे तर सत्कर्म…”, सिद्दीकींच्या हत्येनंतर बिश्नोई गँगची कथित पोस्ट व्हायरल, सलमान खानलाही दिला इशारा
Ujjwal Nikam reaction on Baba Siddique Murder
Ujjwal Nikam on Baba Siddique Murder: “२६/११ च्या हल्ल्याचा दाखला देऊन उज्ज्वल निकमांनी बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर काय सांगितले? पोलिसांना दिले संकेत
Baba Siddique Shot Dead at Bandra Mumbai Breaking News Updates in Marathi
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली
Baba Siddique Murder News
Baba Siddique : बाबा सिद्दीकींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती
Sanjay Raut on Baba Siddique
Sanjay Raut on Baba Siddique: “गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा नको, आता त्यांना…”, संजय राऊत यांची जहरी टीका

सोमवारी सकाळी ८.१५ च्या सुमारास लातूर एक्स्प्रेसमध्ये कळवा स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाला. ठाणे स्थानकाकडे जाण्यापूर्वी एक्स्प्रेस सुमारे २० मिनिटे थांबवण्यात आली होती. त्यामुळे रेल्वे सेवा कोलमडली. तांत्रिक बिघाडामुळे नागपूर-सीएसएमटी दुरांतो एक्स्प्रेससह इतर गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. लातूर एक्स्प्रेस सकाळी ८.५१ वाजता मार्गस्थ झाली, असे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

आणखी वाचा- Mumbai Rain Update : मुंबईत आज मुसळधारेचा अंदाज

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल सेवांना सुमारे ३० मिनिटे उशीर झाला. तसेच काही जलद लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात आल्याने धीम्या मार्गावरील लोकल सेवा कोलमडली. ज्यामुळे सर्व प्रवाशांना विलंब यातना सहन कराव्या लागल्या.