मध्य रेल्वेने आणखी आठ तात्काळ विशेष गाडय़ा कोकण रेल्वे मार्गावर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडय़ांसाठीची तिकिटे आज, रविवारपासून सर्व आरक्षण केंद्रांवर तसेच ऑनलाइन उपलब्ध असतील.
०१००५ डाउन लो. टिळक टर्मिनस-मडगाव ही गाडी २३ आणि ३० मे रोजी  रात्री १२.४५ वाजता निघेल. ही गाडी त्याच दिवशी सकाळी ११.३० वाजता मडगावला पोहोचेल. तर ०१००६ अप मडगाव-लो. टिळक टर्मिनस ही गाडी २३ आणि ३० मे रोजी  दु. १२.३० वाजता निघून लो. टिळक टर्मिनसला रात्री ११.४५ वाजता पोहोचेल.
०१०४५ डाउन लो. टिळक टर्मिनस-मडगाव ही गाडी २४ आणि ३१ मे रोजी रात्री १.१० वाजता निघून मडगावला त्याच दिवशी दुपारी १२.३० वाजता पोहोचेल. तर ०१०४६ अप मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी २४ व ३१ मे रोजी दुपारी ४.०० वाजता निघून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता लो. टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
या गाडय़ांमध्ये वातानुकूलित टू टिअरचा एक डबा, वातानुकूलित थ्री टिअरचे दोन डबे, शयनयान श्रेणीचे सात आणि द्वितीय श्रेणीचे सहा डबे असतील. या गाडय़ा ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी या स्थानकांवर थांबतील.