मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लाॅक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

  • कुठे : माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
  • कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ दरम्यान
  • परिणाम : सीएसएमटी येथून सकाळी १०.४० ते दुपारी ३.१० दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड स्थानकात पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ दरम्यान सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकात अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल मुलुंड – माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकात पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील.

ट्रान्स हार्बर मार्ग

  • कुठे : ठाणे – वाशी/नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर
  • कधी : सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० दरम्यान
  • परिणाम : ब्लाॅक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यानच्या अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ठाणे – वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकल सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ दरम्यान, पनवेल/नेरुळ/वाशी – ठाण्याकडे जाणाऱ्या अप मार्गावरील लोकल सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ दरम्यान रद्द करण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे

  • कुठे : बोरिवली – भाईंदरदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
  • कधी : शनिवारी रात्री १२.३० ते पहाटे ४.३० दरम्यान
  • परिणाम : ब्लॉकच्या कालावधीत अप धीम्या मार्गावरील सर्व लोकल विरार/वसई रोड – बोरिवली/गोरेगाव दरम्यान अप जलद मार्गावरून चालवल्या जातील. त्याचप्रमाणे, विरारच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल गोरेगाव – वसई रोड/विरार दरम्यान डाऊन जलद मार्गावरून चालवल्या जातील. या ब्लॉकच्या कालावधीत काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.