मुंबई : मध्य रेल्वेद्वारे ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवरील फलाटाच्या विस्तारासाठीशनिवारी रात्रकालीन; तसेच परळ आणि करी रोड स्थानकांदरम्यानच्या प्रभादेवीवरील उड्डाणपुलाच्या पायाभूत कामासाठी विशेष वाहतूक ब्लाॅक घेतला आहे. या ब्लाॅकमुळे लोकल सेवा आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

ठाणे आणि डोंबिवली येथे फलाट विस्तारासाठी शनिवारी मध्यरात्री १२ ते रविवारी सकाळी १० दरम्यान ब्लाॅक घेण्यात येणार आहे. हा ब्लाॅक मुलुंड – ठाणे आणि दिवा – डोंबिवली अप आणि डाऊन धीम्या मार्गावर असेल. तर, प्रभादेवी उड्डाणपुलाच्या कामासाठी शनिवारी रात्री ११.१५ ते पहाटे ५.४५ दरम्यान ब्लाॅक असेल.

हा ब्लाॅक दादर – भायखळादरम्यान सर्व मार्गावर असेल. प्रभादेवी येथील उड्डाणपुलाच्या कामामुळे सीएसएमटी – दादर लोकल शनिवारी रात्री १०.३० ते रविवारी सकाळी ६ दरम्यान बंद असेल. ब्लॉक कालावधीत ठाणे आणि डोंबिवलीदरम्यानच्या लोकल अधूनमधून रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत ठाणे आणि डोंबिवली स्थानकांसाठीच्या सेवा उपलब्ध नसतील. काही सेवा दादर किंवा कुर्ला स्थानकांवरच समाप्त केल्या जातील अथवा तिथूनच सुरू होतील.

शनिवारी रात्री १०.४९ ते रात्री १२.३३ वाजता दादरहून सुटणाऱ्या आणि पहाटे ४.४५ वाजता विद्याविहारहून सुटणाऱ्या ते सकाळी ९.०५ वाजता सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन धिम्या लोकल, मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच या लोकल कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत. शनिवारी रात्री ११.२६ ते रात्री ११.५२ आणि शनिवारी रात्री ३.२३ ते रविवारी सकाळी ९.५५

दरम्यान कल्याण येथून सुटणाऱ्या अप धीम्या लोकल सेवा कल्याण – मुलुंडदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल ठाकुर्ली आणि कोपर येथे थांबणार नाहीत. ब्लॉक कालावधीत, अप आणि डाऊन दिशेकडील जलद लोकल त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा या स्थानकांवरही थांबतील.

दादर येथे शनिवारी अंशत: रद्द होणाऱ्या मेल/एक्स्प्रेस

गाडी क्रमांक ०१०८० गोरखपूर – सीएसएमटी विशेष

गाडी क्रमांक ११०२० भुवनेश्वर – सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस

गाडी क्रमांक १२८१० हावडा – सीएसएमटी टर्मिनस मेल

गाडी क्रमांक १२८७० हावडा – सीएसएमटी अतिजलद साप्ताहिक एक्स्प्रेस

गाडी क्रमांक ११०५८ अमृतसर – सीएसएमटी एक्स्प्रेस

दादर येथे रविवारी अंशत: रद्द होणाऱ्या मेल/एक्स्प्रेस

गाडी क्रमांक २२१२० मडगाव- सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस

गाडी क्रमांक १२१३४ मंगळूर जं.-सीएसएमटी एक्स्प्रेस

गाडी क्रमांक १२७०२ हैदराबाद – सीएसएमटी हुसेन सागर एक्स्प्रेस

गाडी क्रमांक १११४० होसपेट- सीएसएमटी

सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडी क्रमांक १०१०४ मडगाव -सीएसएमटी

मांडवी एक्स्प्रेस गाडी क्रमांक १२०५२ मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस

दादर येथून शनिवारी सुटणाऱ्या मेल/एक्स्प्रेस

गाडी क्रमांक २०१११ सीएसएमटी – मडगाव कोकण कन्या एक्स्प्रेस

गाडी क्रमांक ११०५७ सीएसएमटी – अमृतसर एक्स्प्रेस

दादर येथून रविवारी सुटणाऱ्या मेल/एक्स्प्रेस

गाडी क्रमांक १२०५१ सीएसएमटी – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस

गाडी क्रमांक २२११० सीएसएमटी – मडगाव तेजस एक्स्प्रेस