मध्य रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिरा!

मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे बुधवारी सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.

मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे बुधवारी सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. या बिघाडामुळे सध्या मुंबईकडे येणाऱ्या लोकल २० ते २५ मिनिटे उशीराने धावत असल्याचे समजत आहे. त्यामुळे कार्यालये गाठण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेले अनेक महिने मध्य रेल्वेमार्गावर बिघाड आणि अपघाताचे सत्र सातत्याने सुरू असलेले पहायला मिळत आहे. वारंवार मेगाब्लॉक आणि दुरूस्ती करूनही तांत्रिक बिघाड होताना दिसत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Central railway running late today

ताज्या बातम्या