लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई : मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाडाची मालिका सुरू आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास परळ येथे तांत्रिक बिघाड झाला. परळ-दादर दरम्यान लोकल बराच वेळ थांबली होती. त्यामुळे प्रवासी लोकलमधून रेल्वे रुळावर उतरले आणि त्यांनी पायी चालत जवळचे स्थानक गाठले. आणखी वाचा-मुलुंडमधील जागा नाकारण्याच्या घटनेला राजकीय वळण शनिवारी सकाळी ९.४८ वाजता परळ येथे तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे कामावर निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले. लोकल पुढे सरकतच नसल्याने प्रवासी रेल्वे रुळावर उतरले. मध्य रेल्वेने सकाळी १०.०४ च्या दरम्यान बिघाड दुरुस्त करून, लोकल सेवा सुरू केली. दरम्यान, १० ते १५ मिनिटे परळ येथे तांत्रिक बिघाड झाला होता. तो दुरुस्त करून लोकल सेवा पूर्ववत झाली आहे, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.