मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे
मुख्य मार्ग
- कुठे : माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
- कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ पर्यंत
- परिणाम : सीएसएमटी येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल माटुंगा – मुलुंडदरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड स्थानकात पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ दरम्यान सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकात अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल मुलुंड – माटुंगादरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकात पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील.
हेही वाचा
हार्बर मार्ग
- कुठे : सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे डाऊन मार्गावर
- कधी : सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० दरम्यान
- परिणाम : सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे डाऊन मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० दरम्यान आणि चुनाभट्टी / वांद्रे ते सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान ब्लाॅक असेल. या कालावधीत लोकल सेवा रद्द असतील. सीएसएमटी येथून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन लोकल आणि सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते संध्याकाळी ४.४३ दरम्यान वांद्रे/गोरेगावला जाणाऱ्या डाऊन लोकल सेवा रद्द असतील. ब्लॉक कालावधीत पनवेल – कुर्ला दरम्यान विशेष लोकल चालवल्या येतील. हार्बर मार्गावरील प्रवासी ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गाने प्रवास करू शकतात.
पश्चिम रेल्वे
- कुठे : अंधेरी – गोरेगाव आणि माहीम – अंधेरी अप आणि डाऊन मार्गावर
- कधी : सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान
- परिणाम : पश्चिम रेल्वेवरील सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर आणि इतर देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी ब्लाॅक घेण्यात येईल. हार्बर मार्गावरील अंधेरी – गोरेगावदरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत आणि माहीम – अंधेरीदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ४ या कालावधीत ब्लाॅक असेल. या ब्लाॅकमुळे सीएसएमटी – वांद्रे अप आणि डाऊन, सीएसएमटी – गोरेगाव अप आणि डाऊन, पनवेल – गोरेगाव अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द असतील. तसेच चर्चगेट – गोरेगाव स्थानकांदरम्यान काही धीम्या लोकल रद्द असतील.

