मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे – कल्याण अप- डाऊन जलद मार्गावर; तर हार्बर मार्गावरील पनवेल – वाशी अप- डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असेल. पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक नसेल.
मध्य रेल्वे
मुख्य मार्ग
कुठे : ठाणे- कल्याण अप – डाऊन जलद
मार्गावर
कधी : सकाळी १०. ४० ते दुपारी ३.१० पर्यंत
परिणाम : या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्ध-जलद लोकल ठाणे – कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर, डोंबिवली आणि ठाकुर्ली स्थानकांवर थांबतील. तसेच कल्याण येथून
सुटणाऱ्या अप जलद/अर्ध-जलद लोकल कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर, दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवरही थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील.
हार्बर रेल्वे
कुठे : पनवेल – वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील हार्बर सेवा आणि सीएसएमटी
येथून पनवेल/बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. पनवेल येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील ट्रान्स-हार्बर सेवा आणि ठाणे येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. यादरम्यान सीएसएमटी – वाशी मार्गावरील विशेष लोकल धावतील. तर, ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बरवरील सेवा उपलब्ध असेल.
