नववर्षाच्या स्वागतनिमित्त ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या नागरिकांनी रात्री उशीरा घरी पोहोचता यावे यासाठी मध्य रेल्वेनेही चार विशेष लोकल फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसएमटी-कल्याण, पनवेल मार्गावर या फेऱ्या होतील.
हेही वाचा >>> मुंबई: ८० लाख रुपयांच्या बनावट नोटांसह तरूणाला अटक; ५०० रुपयांच्या १६ हजार नोटा जप्त – गुन्हे शाखेची कारवाई
३१ डिसेंबर रोजी सीएसएमटी-कल्याण लोकल मध्यरात्री १.३० वाजता सुटेल आणि कल्याणला पहाटे ३ वाजता पोहोचेल. तर कल्याणहून सीएसएमटीसाठी मध्यरात्री १.३० वाजता लोकल सुटेल आणि ३ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. या दोन फेऱ्या धीम्या मार्गवर असतील. तर हार्बरवरही दोन फेऱ्या धावणार आहेत. सीएसएमटीहून पनवेलसाठी मध्यरात्री १.३० वाजता आणि पनवेलहून सीएसएमसाठी मध्यरात्री १.३० वाजता लोकल सोडण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेनेही ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीही आठ विशेष लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. चर्चगेट – विरार – चर्चगेट मार्गावर या फेऱ्या होणार आहेत. या फेऱ्या धीम्या असतील.