scorecardresearch

पतीच्या हत्येप्रकरणी महिलेवर आरोपपत्र, दररोज जेवणातून विष दिल्याचा ठपका

खाण्या-पिण्यात विषारी धातू मिसळून पतीची हत्या केल्याप्रकरणी अटक पत्नी व तिच्या प्रियकराविरोधात गुन्हे शाखेने १३६५ पानांचे आरोपपत्र सोमवारी न्यायालयात दाखल केले.

crime news
(प्रातिनिधीक छायाचित्र)

मुंबई : खाण्या-पिण्यात विषारी धातू मिसळून पतीची हत्या केल्याप्रकरणी अटक पत्नी व तिच्या प्रियकराविरोधात गुन्हे शाखेने १३६५ पानांचे आरोपपत्र सोमवारी न्यायालयात दाखल केले. गंभीर बाब म्हणजे अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या पतीच्या हत्येसह आरोपींनी मालमत्ता हडप करण्यासाठी सासूलाही अशाच पद्धतीने मारल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. 

कमलकांत कपूरचंद शहा ४७ वर्षांच्या व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी डिसेंबर महिन्यात पत्नी कविता ऊर्फ काजल कमलकांत शहा आणि तिचा प्रियकर हितेश शांतीलाल जैन यांना गुन्हे शाखेच्या कक्ष-९च्या पोलिसांनी अटक केली होती. कविताची सासू सरला शहा यांचा १३ ऑगस्ट २०२२ रोजी मृत्यू झाला होता. तपासात आरोपींनी त्यांनाही अशा प्रकारे मारल्याचे निष्पन्न झाले. याबाबत तपासाचाही समावेश या आरोपपत्रात करण्यात आला आहे. जेवणातून या दोघांना अर्सेनिक आणि थेलियम धातू दिला जात होता, असे तपासात आढळून आले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 01:03 IST