मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिला व हवामान बदल या विषयांवर काम करणाऱ्या संस्थांनी राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी ‘महिला आणि हवामान बदलावरील जनतेच्या मागण्यांची सनद’ तयार केली आहे.‘रिसोर्स ॲण्ड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट’ आणि ‘बाईमाणूस मीडीया रिसर्च फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ही सनद तयार केली आहे. महिलांना स्थानिक आणि राज्यस्तरीय हवामान मंडळे आणि निर्णय घेणाऱ्या समित्यांमध्ये प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी या सनदीमध्ये करण्यात आली आहे. याचबरोबर अन्न, पाणी आणि स्वच्छतेच्या संदर्भातील महिलांच्या समस्या समजून घेऊन हवामान संकटाचा सामना करण्यासाठी उपाययोजना कराव्या, तसेच असंघटित क्षेत्रातील महिलांसाठी हवामान आपत्ती प्रतिरोधक असणारी घरकुल रचना आणि आर्थिक संरक्षणाची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. तसेच उर्जा संक्रमणामुळे प्रभावित होणाऱ्या महिला समुदायांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण व उपक्रमांची आखणी करणे गरजेचे असल्याचे या सनदेत नमूद केले आहे.
‘महिला आणि हवामान बदलावरील जनतेच्या मागण्यांची सनद’; राजकीय पक्ष आणि उमेदवारांना आवाहन
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिला व हवामान बदल या विषयांवर काम करणाऱ्या संस्थांनी राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी ‘महिला आणि हवामान बदलावरील जनतेच्या मागण्यांची सनद’ तयार केली आहे.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-11-2024 at 18:35 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Charter of people demands on women and climate change appeal to political parties and candidates mumbai print news amy