टाटा स्टील कंपनीच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख चारुदत्त देशपांडे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारीही जमशेदपूर येथील टाटा स्टील कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची गुरुवारपासून सुरू केलेली चौकशी शुक्रवारही सुरू होती. आवश्यकता भासल्यास व्यवस्थापकीय संचालकां-चीही चौकशी केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला आहे. वसई विभागाचे उपअधीक्षक दीपक देवराज यांच्यासह गुन्हे अन्वेषण विभागाचे पाच अधिकारी ही चौकशी करीत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांची गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली.