मुंबई अहमदाबाद महामार्गावर केमिकल टँकरला आग; वाहतूक विस्कळीत

सध्या या मार्गावरील वाहतूक धिम्यागतीन सुरु

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटीवळील मेंढवन येथे टँकरला भीषण आग लागली.
टँकरच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टँकर पलटी झाला आणि त्यानंतर टँकरने पेट घेतला. दरम्यान, या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे. आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या ही दुर्घटना घडली. या अपघातानंतर अहमदाबादकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली. घटनास्थळावर स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सध्या या मार्गावरील वाहतूक धिम्यागतीन सुरु करण्यात आलीये.

(संग्रहित छायाचित्र)

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Chemical tanker accident at mumbai ahemdabad highway

ताज्या बातम्या