भुजबळ काका-पुतण्याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

विशेष न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ११ मेपर्यंत वाढ केली

Chhagan Bhujbal , महाराष्ट्र सदन, छगन भुजबळ, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
संग्रहित छायाचित्र: छगन भुजबळ

महाराष्ट्र सदन आणि अन्य आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सध्या अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत विशेष न्यायालयाने गुरुवारी पुन्हा एकदा वाढ केली. दोघांच्या न्यायालयीन कोठडीत ११ मेपर्यंत वाढ करण्यात आली. याआधी वाढ करण्यात आलेल्या कोठडीची मुदत बुधवारी संपल्याने दोघांचीही कोठडी वाढवून देण्याची मागणी अंमलबजावणी संचालनालयातर्फे न्यायालयाकडे करण्यात आली. ही मागणी मान्य करत न्यायालयाने भुजबळ काका-पुतण्याच्या कोठडीत ११ मेपर्यंत वाढ केली.
दोनच दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्यांची पुन्हा आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Chhagan bhujbal and sameer bhujbals judicial custody extended