अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र, अनेक ठिकाणी अद्याप शेतपिकांचे पंचनामे झालेले नाहीत. शासकीय कर्मचारी संपावर असलेल्या हे पंचनामे रखडले असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे. विधिमंडळ परिसरात टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा –गोळीबार करून दोघांचा जीव घ्यायला ही काय मोगलाई आहे का?, अजित पवारांचा सरकारला सवाल
काय म्हणाले छगन भुजबळ?
“राज्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. काल मी नांदेड
हेही वाचा – “…त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही”; शेतपिकांच्या रखडलेल्या पंचनाम्यांवरून अजित पवारांचा हल्लाबोल!
“मग सर्वसामान्यांचे अश्रू कोण पुसणार?”
“सरकार सर्वसामान्यांचं आहे, असं म्हटलं जातं. मग सर्वसामान्यांचे अश्रू कोण पुसणार? जनतेचे अश्रू पुसायचं सोडून शिंदे सरकार एकमेकांवर आरोप करण्यात व्यक्त आहे. सरकारकडून केवळ राजकारण करण्यात येत असून जनतेकडे दुर्लेक्ष केलं जात आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग
दरम्यान, शेतपिकांच्या रखडलेल्या पंचनाम्यांवरून विरोधकांनी आज आक्रमक पावित्रा घेतला. राज्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत अजित पवार