छगन भुजबळ सुटणार म्हणून समर्थकांनी दगडूशेठ गणपतीसमोर केली आरती

दिल्ली येथील महाराष्ट्र सदन आणि अन्य आर्थिक घोटाळया प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे दोन तुरुंगात होते. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कालच त्यांना जामीन मंजूर केला.

दिल्ली येथील महाराष्ट्र सदन आणि अन्य आर्थिक घोटाळया प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे दोन वर्ष तुरुंगात होते. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कालच त्यांना जामीन मंजूर केला. या निर्णयाची घोषणा होताच राज्यातील विविध भागात भुजबळ समर्थक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजून आणि पेढे वाटून आंनद उत्सव साजरा केला.

त्याच प्रमाणे पुण्यात देखील आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपती समोर आरती करून आणि भाविकांना पेढे वाटून आंनद उत्सव साजरा केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी शहर अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, सताधारी पक्षाने कोणतेही पुरावे नसताना घोटाळ्या प्रकरणी मागील दोन वर्षांपासून छगन भुजबळ यांना तुरुंगात ठेवले, याची खंत असून काल त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. ते लवकरच सर्व आरोपातून निर्दोष मुक्त होतील असे त्या म्हणाल्या.

जामीन मिळाला पण इतक्यात घरी जाता येणार नाही
बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला असला तरी ते घरी जाऊ शकणार नाहीयेत. कारागृहातील मुक्काम संपला असला तरी त्यांचा रुग्णालयातील मुक्काम मात्र वाढला आहे. स्वादूपिंडाचा त्रास असल्यामुळे भुजबळांवर उपचार सुरु आहेत. सध्या केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून, त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स आदी प्रकरणांत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल असलेल्या तीन गुन्ह्याप्रकरणी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना सक्तवसुली महासंचालनालयाकडून (ईडी) १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. भुजबळ यांची मुंबईतील ईडीच्या मुख्यालयात चौकशी सुरू होती. छगन भुजबळ यांनी आपण चौकशीत सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले होते मात्र, सरकारकडून सुडाचे राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chhagan bhujbal ncp bail

ताज्या बातम्या