राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ जामिनावर सुटून बाहेर आल्यापासून ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. कठिण काळात पक्षाने साथ न दिल्यामुळे त्यांच्या मनात एक नाराजीची भावना असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतात. यासंबंधी बुधवारी एका कार्यक्रमात त्यांना थेट प्रश्न विचारण्यात आला.

ओबीसी चेहरा असल्यामुळे तुम्हाला अन्य पक्षांकडून ऑफर आहे का ? या प्रश्नावर भुजबळ म्हणाले कि, मला कोणी घ्यायला तयार आहे असे वाटत नाही. त्यावर शिवसेना, मनसे या पक्षांनी तुमच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली हा मुद्दा उपस्थित झाला. त्यावर भुजबळ म्हणाले कि, ठाकरे कुटुंबाबरोबर सलोख्याचे कौटुंबिक संबंध आहेत. त्याचा अर्थ पक्ष सोडतो असा होत नाही.

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
ajit pawar and supriya sule
स्नुषाविरोधात प्रचार करण्यास नकार देण्याची एकनाथ खडसेंची भूमिका सुसंस्कृतपणाची;  खासदार सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांना चिमटा
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

बाळासाहेब ठाकरे एक दिलदार नेते होते. इतकी वर्ष शिवसेनेत काढल्यानंतर ओबीसीच्या प्रश्नावर शिवसेना सोडली असे त्यांनी सांगितले. पक्ष बदलाच्या प्रश्नावर त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट केले.

कसा होता भुजबळांचा तुरुंगातील अनुभव
तुरुंगात असताना वेळ घालवण्यासाठी वाचनाचा एक पर्याय होता. तुरुंगात वेगवेगळया विषयांवरील पुस्तके, वर्तमानपत्रे वाचायचो. आयुष्यात केलं नाही इतक वाचन मी तुरुंगात असताना केलं असे जामिनावर बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात ते बोलत होते. रोज वेगवेगळी वर्तमानपत्रे वाचत असल्यामुळे बाहेर काय चाललयं ते वर्तमानपत्रांमधून समजत होते.

दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेल्या पद्मावत चित्रपटाचा संपूर्ण वाद वर्तमानपत्रांमुळे समजला असे छगन भुजबळ यांनी सांगितले. जेलमध्ये फक्त दूरदर्शन पाहायला मिळायचे. डीडीचे एकच चॅनल लागायचे. तुरुंगातल्या बराकीतून समोरच्या टीव्हीवर जे लागलेले असायचे ते पाहत बसायचो. एकही नवीन सिनेमा पाहता आला नाही पण काही जुने सिनेमे पाहता आले असे तुरुंगातील अनुभव सांगताना भुजबळ म्हणाले.