मुंबई : एका बाजूला मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली सर्व शक्ती पणाला लावत असताना, त्यांच्याच मंत्रिमंडळातील एक ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले असून ओबीसींमधून मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना त्यांनी खुले आव्हान दिले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात राहून मुख्यमंत्र्यांच्याच भूमिकेला विरोध करणाऱ्या भुजबळांना राजकीय बळ कुणाचे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेनेमध्ये असल्यापासून छगन भुजबळ हे आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध होते. काँग्रेसमध्ये आल्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काही काळ आक्रमकता जपली; परंतु त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये मंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर त्यांची आक्रमकता कमी होत गेली. महाराष्ट्र सदन घोटाळय़ात झालेल्या अटकेनंतर भुजबळ पार बदलले. शिंदे सरकारमध्ये मंत्री असताना ते मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देण्याच्या विरोधात पुन्हा आक्रमक होऊन मैदानात उतरले आहेत. ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी आपण लढत असल्याचा त्यांचा दावा आहे, परंतु या आधी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना व ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यावर त्यांची आक्रमकता का दिसली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

BJP workers waited four hours for Priyanka Gandhis road show
नवलचं! प्रियंका गांधींच्या ‘रोड-शो’साठी भाजपचे कार्यकर्ते चार तास प्रतीक्षेत का होते?
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Aditi Tatkare
मविआतील बंडखोरी आदिती तटकरेंच्या पथ्यावर ?
maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
Former Shiv Sena MLA Mahadev Babar announced support for independent candidate Gangadhar Badhe
हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांचा मोठा निर्णय ! महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांंच्या अडचणी वाढल्या
Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र

हेही वाचा >>> “मराठा अभिमानापेक्षा कुणबी शब्द धारण करून आरक्षण घ्या”, मनोज जरांगेंचं आवाहन

मनोज जरांगे पाटील यांच्या मागे संपूर्ण मराठा समाज एकवटला असताना, त्या समाजाला विरोध करण्याची भुजबळ यांची हिंमत कशी होते, तेही सरकारमध्ये मंत्री असताना, त्यामुळे त्यांचा ‘बोलवता धनी’ कुणी तरी वेगळाच असावा, अशा  शंकेचे सूरही निघत आहेत.

जरांगे पाटील यांचे दुसऱ्यांदा उपोषण सोडायला लावताना राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षणाचा प्रश्न डिसेंबरअखेपर्यंत सोडविण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले. मात्र त्यानंतर लगेच मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसींमधून आरक्षण मागण्याच्या जरांगे यांच्या विरोधात जालना जिल्ह्यात  अंबड येथे ओबीसींचा महामेळावा घेऊन भुजबळ यांनी लढाईचे रणिशग फुंकले.

जरांगे यांनी त्यांच्या पहिल्या उपोषणाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विश्वास व्यक्त करणे आणि एक उपमुख्यमंत्री कलाकार आहेत, असे म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता, त्यांच्याबद्दल अविश्वास व्यक्त करणे, ही भुजबळांच्या आक्रमकतेची पार्श्वभूमी तर नाही ना, अशी शंका घेतली जात आहे.  उपोषणाच्या वेळी जमलेल्या जमावावर पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे गृह खात्यावर विशेषत: फडणवीसांवर टीका झाली. अंबडच्या सभेत त्याचा जाणीवपूर्वक उल्लेख करुन जमावाच्या दगडफेकीत पोलीस जखमी झाले, ते का समोर आणले नाही, असा सवाल करुन भुजबळ यांनी एक प्रकारे फडणवीसांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

हेही वाचा >>> मराठा आरक्षणाला सर्वपक्षीय पाठिंब्याची गरज – मनोज जरांगे पाटील

सरकारने सरकारसारखे वागले पाहिजे- भुजबळ

मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊनम् आरक्षण देण्याची मागणी करणारे मनोज जरांगे-पाटील यांच्या विरोधात राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आक्रमकपणे उभे राहिले आहेत. आपली ही आक्रमकता सरकारलाही आव्हान देणारी नाही का, असे भुजबळ यांना विचारले असता, सरकारने सरकारसारखे वागले पाहिजे. कायदा वगैरे काही आहे की नाही? आमच्या सभा रात्री १० वाजता बंद केल्या जातात, त्यांना रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी, हे बरोबर नाही, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले. मी आधी आक्रमक झालो नाही; परंतु त्यांनी गावबंदी करायची, लोकांची घरे जाळायची, पोलिसांना जखमी करायचे, आम्ही गप्प बसावे का, असा सवाल त्यांनी केला. माझी भूमिका मी घेऊनम् निघालो आहे, पक्षाचा मला पाठिंबा आहे की नाही याचा मी विचार करीत नाही, अर्थात पक्षाने मला विरोध केलेला नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मुरब्बी राजकारणी भुजबळांना हे शोभत नाही- जरांगे

कराड :  यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊन राज्य करणारे राज्यकर्ते जहरी वक्तव्य करून आपली राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी जातीय दंगली भडकवण्याचे षडयंत्र रचत असल्याची टीका मनोज जरांगे-पाटील यांनी केली. मुरब्बी राजकारणी छगन भुजबळांना काहीही बरळायचे, हे शोभत नसल्याचा निशाणा त्यांनी साधला. कराडमधील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक झाल्याचे समाधान व्यक्त करून, जरांगे-पाटील म्हणाले, की मराठा समाजाला कुणबीचे पुरावे मिळाले तर दाखले द्यावे लागतील म्हणूनच भुजबळांच्या पोटातील विखारी विचार ते गटारगंगेसारखे बाहेर टाकत आहेत. राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांच्या डोक्यात निजामशाही विचार भिनले आहेत, अशी टीका त्यांनी केली.