scorecardresearch

नाहक त्रास दिला जात असल्याचा छगन भुजबळ यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांना पत्र

शिवीगाळ किंवा कोणालाही धमकी दिलेली नव्हती. तरीही टेकचंदानी यांच्या तक्रारीवरून माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची बाब माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

नाहक त्रास दिला जात असल्याचा छगन भुजबळ यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांना पत्र
छगन भुजबळ

मुंबई : देवी सरस्वती आणि महापुरुषांच्या प्रतिमा यावरून केलेल्या विधानावरून चेंबूरमधील ललित टेकचंदानी यांनी आपल्याला त्रास दिला होता. मी शिवीगाळ किंवा कोणालाही धमकी दिलेली नव्हती. तरीही टेकचंदानी यांच्या तक्रारीवरून माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची बाब माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. ललित टेकचंदानी हे पूर्वी आमच्या घरी येत असत. त्यांच्या विरोधात तक्रारी आल्यावर त्यांना रोखण्यात आले होते.

या रागातून त्यांनी माझ्या विरोधात ईडीकडे तक्रारी व माहिती दिली होती. गेल्या आठवडय़ात मी केलेल्या विधानानंतर त्यांनी एसएमएसच्या माध्यमातून मलाच त्रास दिला होता. माझी निंदानालस्ती केली होती. मी त्यांच्याशी बोललोही नाही वा त्यांना काही संदेशही पाठविला नव्हता. उलट त्यांनी मलाच अनेक संदेश पाठविले. मी त्याकडे दुर्लक्ष केले होते. तरीही टेकचंदानी यांनी माझ्याविरोधात धमकी दिल्याची तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी माझ्यासह दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.  या प्रकाराशी काहीही संबंध नसताना गुन्हा दाखल करण्यात आल्याचे भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या