मुंबई : देवी सरस्वती आणि महापुरुषांच्या प्रतिमा यावरून केलेल्या विधानावरून चेंबूरमधील ललित टेकचंदानी यांनी आपल्याला त्रास दिला होता. मी शिवीगाळ किंवा कोणालाही धमकी दिलेली नव्हती. तरीही टेकचंदानी यांच्या तक्रारीवरून माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची बाब माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. ललित टेकचंदानी हे पूर्वी आमच्या घरी येत असत. त्यांच्या विरोधात तक्रारी आल्यावर त्यांना रोखण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या रागातून त्यांनी माझ्या विरोधात ईडीकडे तक्रारी व माहिती दिली होती. गेल्या आठवडय़ात मी केलेल्या विधानानंतर त्यांनी एसएमएसच्या माध्यमातून मलाच त्रास दिला होता. माझी निंदानालस्ती केली होती. मी त्यांच्याशी बोललोही नाही वा त्यांना काही संदेशही पाठविला नव्हता. उलट त्यांनी मलाच अनेक संदेश पाठविले. मी त्याकडे दुर्लक्ष केले होते. तरीही टेकचंदानी यांनी माझ्याविरोधात धमकी दिल्याची तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी माझ्यासह दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.  या प्रकाराशी काहीही संबंध नसताना गुन्हा दाखल करण्यात आल्याचे भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal write letter to chief minister eknath shinde for lalit tekchandani troubling zws
First published on: 04-10-2022 at 07:29 IST