लोकसत्ता, प्रतिनिधी

मुंबई : केंद्रात सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता स्थापन होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात श्रीकांत शिंदे यांचा सामावेश असणार नाही, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसत्ताशी बोलताना केली. शिवसेना हा पक्ष माझी खासगी मालमत्ता नाही. श्रीकांत यांनाही पक्षाच्या कामातच स्वारस्य आहे. त्यामुळे शिवसेनेतील मंत्रिमंडळाचा निर्णय येत्या रविवारी गुणवत्तेनुसारच होईल असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

guardian minister uday samant statement on mla bharat gogawale after press reporter question
भरत गोगावले हेच रायगडचे अदृश्य पालकमंत्री; पालकमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
arvind kejriwal health
“केजरीवाल कोमात जाऊ शकतात”; आप खासदाराचा दावा, आप आणि तिहार तुरुंग अधीक्षकांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत मतभेद का आहेत?
aspirants pressuring senior leaders for cabinet expansion in maharashtra
मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पुन्हा सुरू; १२ आमदारांच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू
mahayuti likely to contest upcoming assembly elections under the leadership of cm eknath shinde
भाजप नेतृत्वाचे शिंदेंना झुकते माप? महायुतीची धुरा मुख्यमंत्र्यांच्याच खांद्यावर सोपवण्याची शक्यता
Nana Patole on Eknath Shinde
“राज्याचे मुख्यमंत्री गंभीर माणूस नाहीत, खुर्ची वाचवणं हेच…”, नाना पटोलेंची मुख्यमंत्री शिंदेंवर खोचक टीका
What Eknath Shinde Said?
“एकदा मार खाल्लाय,आता ताकही फुंकून…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सल्ला
Loksatta anvyarth Prime Minister Narendra Modi ministership Chandrababu Naidu
अन्वयार्थ: चंद्राबाबूंचे चोचले चालतील?
Political discussion with Abdul Sattar Nagesh Patil Ashtikar visit to Mumbai
सत्तार, अष्टीकर आणि बांगर भेटीने चर्चेला उधाण

केंद्रात महायुतीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला यंदा किमान दोन कॅबिनेट मंत्रीपदे मिळतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडून यासाठी काही नावे चर्चेत असली तरी त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी मागणी पक्षाच्या काही खासदारांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांना भेटून केली. मुख्यमंत्र्यांनी मात्र श्रीकांत पक्ष संघटनेतच काम करेल अशी स्पष्टोक्ती लोकसत्ताशी बोलताना केली. श्रीकांत यांना पक्ष संघटनेत अधिक रस आहे. राज्याच्या ग्रामीण भागात संघटना अधिक जोमाने वाढावी यासाठी ते काम करू पाहतात त्यामुळे श्रीकांत यांनी मंत्रिमंडळात सहभागी होऊ नये, असे माझेही मत आहे असे स्पष्ट केले. या पक्षाचे आमदार, खासदार, कार्यकर्ते माझ्या कुटुंबासारखे आहेत.