लोकसत्ता, प्रतिनिधी

मुंबई : केंद्रात सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता स्थापन होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात श्रीकांत शिंदे यांचा सामावेश असणार नाही, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसत्ताशी बोलताना केली. शिवसेना हा पक्ष माझी खासगी मालमत्ता नाही. श्रीकांत यांनाही पक्षाच्या कामातच स्वारस्य आहे. त्यामुळे शिवसेनेतील मंत्रिमंडळाचा निर्णय येत्या रविवारी गुणवत्तेनुसारच होईल असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister eknath shinde candid speech shrikant shinde is responsible for party organization amy