scorecardresearch

Premium

‘आनंदाचा शिधा’ मध्ये मैदा, पोह्याचा समावेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

dewendra fadanvis and eknath shinde 18
( दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला )

मुंबई : दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या शिध्यामध्ये चणा डाळ आणि रवा अध्र्या किलोने कमी करून त्यात प्रत्येकी अर्धा किलो मैदा आणि पोह्याचा समावेश करण्यात आला आहे.

याआधी ‘आनंदाचा शिधा’ या संचात प्रत्येकी एक किलो रवा, चणा डाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल असे चार जिन्नस होते. मात्र आता त्यात दोन जिन्नसांची भर पडली आहे. त्यात आता एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा, चणाडाळ, मैदा आणि पोहे असा शिधा राहील.

E Peak case
अकोला : ई-पीक प्रकरणात मुख्यमंत्री, मंत्र्यांना बजावली नोटीस, नेमकं प्रकरण काय जाणून घ्या..
What chhagan bhujbal Said?
“अजित पवारांना राजकीय आजारपण…”, दिल्ली दौऱ्यातील अनुपस्थितीबाबत छगन भुजबळांचं वक्तव्य, म्हणाले…
sudhir Mungantiwar praised by CM
लंडन येथून वाघनखे आणण्यात नक्कीच यश, मुख्यमंत्री शिंदेंकडून मुनगंटीवार यांचे कौतुक
ganesh mandal in maharashtra
गणेश मंडळांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता पाच वर्षांसाठी एकदाच…

हेही वाचा >>>पंतप्रधान आवास योजनेत राज्याची कामगिरी असमाधानकारक, पावणेपाच लाख घरे अद्यापही अपूर्ण

राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्रय़ रेषेवरील केशरी शेतकरी अशा १ कोटी ६६ लाख ७१ हजार शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल. हा आनंदाचा शिधा २५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबपर्यंत वितरित करण्यात येईल.  यासाठी येणाऱ्या एकूण ५३० कोटी १९ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये

नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यास आणि त्यासाठी ४५ पदांना मंजुरी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.  सध्या नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयांमध्ये ८ हजार ४१८ न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित आहेत. नवीन  न्यायालयांच्या उभारणीपोटी पाच कोटी ६० लाख ५४ हजार खर्चासही मान्यता देण्यात आली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chief minister eknath shinde has decided to give anand ration to the ration card holders on the occasion of diwali amy

First published on: 04-10-2023 at 01:54 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×