scorecardresearch

Premium

मोदी पुन्हा पंतप्रधान होणार हेच निकालाने अधोरेखित; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन

आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे प्रचंड मताधिक्याने निवडून येऊन पुन्हा पंतप्रधान होतील आणि काँग्रेस व इंडिया आघाडीचे पानिपत होईल, हेच चार राज्यांच्या निवडणूक निकालांनी अधोरेखित केल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

eknath shinde
(मुंबईत शिवसेना शिंदे गटाची प्रतिनिधी सभा रविवारी झाली. यावेळी विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाबद्दल पक्ष नेत्यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.)

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे प्रचंड मताधिक्याने निवडून येऊन पुन्हा पंतप्रधान होतील आणि काँग्रेस व इंडिया आघाडीचे पानिपत होईल, हेच चार राज्यांच्या निवडणूक निकालांनी अधोरेखित केल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

शिंदे म्हणाले, मोदी यांची लोकप्रियता, करिष्मा व देशाभिमान, गृहमंत्री अमित शहा यांचे नियोजन यामुळे एनडीएला  यश मिळाले. हर घर मोदी, असे आधी म्हटले जात होते, आता प्रत्येक मनात मोदी (हर मन मोदी) असे चित्र आहे. मोदी यांच्या बदनामीचे षडयंत्र आखले गेले, विरोधकांकडून अनेक आरोप झाले. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली व परदेशात जाऊन भारत तोडो, असे आरोप केले. पण जनता ही देशावर प्रेम करते व तिला सर्व काही समजते. मोदी यांनी देशाचा लौकिक जगभरात वाढविला आहे. त्यामुळे जनतेने मोदींनाच भरभरून कौल दिला आहे आणि राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा असफल ठरली आहे.

Eknath Shinde viral video of karyakram karen
“मुख्यमंत्री साहेब, कार्यक्रम म्हणजे काय समजायचं?”, मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ VIDEO शेअर करत काँग्रेसचा सवाल
Prime Minister Narendra Modi expressed confidence about the upcoming Lok Sabha elections
आयेगा तो मोदीही! पंतप्रधानांना विश्वास; परदेशांतून जुलै-ऑगस्टमधील आमंत्रणे आल्याचा दावा
ram mandir congress
उत्तर प्रदेशच्या दोन काँग्रेस आमदारांची मुख्यमंत्री योगींसोबत अयोध्या यात्रा; पक्षांतर्गत मतमतांतरं असण्यामागे कारण काय?
Tejaswi Yadav slams Nitish Kumar Bihar Assembly
नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार नाहीत, ही मोदी गॅरंटी आहे का? तेजस्वी यादव यांची टीका

हेही वाचा >>> हिंदी’ पट्टय़ात भाजप भक्कम, काँग्रेसला दक्षिणेचा हात

आम्ही सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज दहा दिवसात माफ करू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी राजस्थानमध्ये गेल्या निवडणुकीत दिले होते. पण पाच वर्षांत काहीच केले नाही. कर्नाटकमध्येही निवडणुकीत अनेक आश्वासने दिली. पण नंतर राज्य सरकारकडे ती पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधी नसल्याची कारणे देण्यात येत आहेत. पण पंतप्रधान मोदी हे देशातील सर्वसामान्यांची काळजी घेत असून जनतेला सर्व समजते. त्यामुळे जनता मोदींच्या पाठीशी असून त्यांचे कर्तृत्व शिखरावर असल्याचे सिद्ध झाले आहे, असे शिंदे यांनी नमूद केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chief minister eknath shinde reaction that the result underlines that modi will become the prime minister again amy

First published on: 04-12-2023 at 06:54 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×