मुंबई : केंद्रात आणि राज्यातील सत्ता असे आपले डबल इंजिन सरकार असून आगामी महानगरपालिका निवडणुकीतही जोरदार विजय मिळवून तिहेरी इंजिन सुरू होईल आणि मुंबईच्या विकासाची गती आणखी वाढेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी व्यक्त केला.

केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ असल्याने मुंबईचा तीन वर्षांत कायापालट करून बाहेर गेलेल्या मुंबईकरांना परत आणण्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी व्यक्त केला. विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर देऊ, असा टोला लगावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवा महाराष्ट्र घडविण्याचा संकल्पही केला. पुढील काही काळात मुंबई खड्डेमुक्त होईल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
BJP spent 38 crores in online advertisements in three months
‘फिर एक बार’साठी तीन महिन्यांत ३८ कोटींचा खर्च; ऑनलाइन जाहिरातींमध्ये भाजपचाच वाटा मोठा, २०१९च्या तुलनेत तिप्पट वाढ
380 crore fraud case
३८० कोटी फसवणूक प्रकरण : आरोपीचा तीन राज्यांमध्ये १२ दिवस पाठलाग, अखेर उत्तराखंड येथून अटक
BJP leaders in Gadchiroli
आयारामांची संख्या वाढल्याने भाजप नेते अस्वस्थ; भविष्यातील राजकारण धोक्यात…

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मेट्रो वाहिन्यांचे भूमिपूजन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असताना २०१५ मध्ये करण्यात आले होते आणि ३५ किमीच्या दोन टप्प्यांचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात येत आहे. हा एक योगायोग आहे. हे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होऊ नये, अशी काहींची इच्छा होती. पण नियतीची इच्छा वेगळीच होती. लोकोपयोगी कामांचा श्वास गुदमरला होता. आम्ही त्यातून जनतेची सुटका केली, असे शिंदे यांनी सांगितले.

गेल्या २०-२५ वर्षांत जी कामे झाली नाहीत, ती कामे गेल्या सहा महिन्यांत सुरू झाल्याने विरोधकांना पोटदुखी होत आहे. मळमळ होत आहे आणि छातीत धडकी भरली आहे. आम्ही शेतकऱ्यांनाही मोठी आर्थिक मदत केली आहे. पण विरोधकांनी टीका करीत राहावे आणि वेगाने काम करीत राहू. दरवर्षी मुंबईतील रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामातून आपले उखळ पांढरे करणाऱ्यांना रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे दु:ख होत आहे. पण पुढील ३०-४० वर्षांत रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत आणि लवकरच मुंबई खड्डेमुक्त होईल. मुंबईकरांचा पैसा वाचविण्याचे काम आम्ही केले आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेल्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नुकतेच झाले. शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूही पुढील काही महिन्यात पूर्ण होईल. सुमारे ३०० किमी मेट्रो रेल्वे प्रकल्पांची कामे सुरू आहेत. ती पूर्ण झाल्यावर सुमारे ३०-४० लाख वाहने रस्त्यावरून कमी होतील. वाहतुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाल्यावर मुंबईकरांच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल जगभरातील नेते व मान्यवरांना आदर व विश्वास असल्यानेच राज्य सरकारला दावोस येथील गुंतवणूक परिषदेत एक लाख ५५ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करता आले, असे शिंदे यांनी नमूद केले.

पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी स्वत:ची घरे भरली : फडणवीस ; शिवसेनेवर टीका

मुंबई : महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी गेल्या पंचवीस वर्षांत आपली घरे भरली आणि महापालिकेचा निधी मुदत ठेवीत ठेवला, पण मुंबईकरांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारला नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख न करता शिवसेनेवर केली.

महाराष्ट्रातील जनतेने डबल इंजिन सरकार सत्तेवर आणले, पण काहींनी बेइमानी केली. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा कार्यकर्ता असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ आणि पंतप्रधान मोदी यांचा भक्कम पाठिंबा यामुळे आमचे सरकार सत्तेवर आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारने पंतप्रधान स्वनिधी योजना रखडविल्याने लाखो फेरीवाल्यांना मदत मिळू शकली नव्हती. आता या योजनेचा लाभ अन्य शहरांमध्येही दिला जाईल, असे फडणवीस म्हणाले. कोणतीही प्रक्रिया न करता करोडो लिटर सांडपाणी समुद्रात सोडले जात होते. त्यामुळे मी मुख्यमंत्री असताना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसाठी (एसटीपी) केंद्र सरकारच्या मंजुऱ्या आणल्या होत्या. पण टक्केवाऱ्या न ठरल्याने प्रकल्प होऊ शकले नव्हते, असेही त्यांनी सांगितले. 

मोदी यांनी रेल्वेची जमीन उपलब्ध करून दिल्याने धारावी पुनर्विकास प्रकल्पही मार्गी लागत असून एक लाख झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन केले जाईल.  या प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होईल, असे फडणवीस म्हणाले.

भूमिपूजन आणि लोकार्पणही मोदी यांच्याच हस्ते

नरेंद्र मोदी यांनी ज्या ‘मेट्रो २’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांचे भूमिपूजन केले होते, त्याच मार्गिकांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. हा योग दुर्मीळ असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. तर मेट्रोची कामे मधल्या काळात संथगतीने सुरू होती, पण आता डबल इंजिन सरकार आले असून हे सरकार एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मेट्रोच्या कामांना गती देईल असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच ३०० किमीहून अधिक लांबीचे मेट्रोचे जाळे विणले जाईल आणि मुंबईचा कायापालट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.