मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशद्रोह्यांना चहापानाला बोलावले होते का? आणि कशासाठी?, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथे केला. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्यावर ‘बरे झाले, देशद्रोह्यांबरोबर चहापान टळले’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केल्याने वाद निर्माण झाला आहे. मी विरोधकांविषयी बोललो नाही, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला असला तरी त्यांनी ‘कोणाविषयी हे वक्तव्य केले, देशद्रोह्यांना चहापानाला का बोलावले होते का?, अशी विचारणा ठाकरे यांनी केली.
