जगभरातील मराठी वाचकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेल्या ‘लोकसत्ता’चा ६६ वा वर्धापनदिन सोहळा बुधवारी मोठय़ा दिमाखात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. वर्धापनदिनाच्या निमित्ताने लोकसत्ताने या वर्षांपासून ‘वर्षवेध’ हे नवे प्रकाशन सुरू केले आहे. गतवर्षांतील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती देणाऱ्या ‘लोकसत्ता वर्षवेध -२०१३’ या मराठी वार्षिकीचे प्रकाशन आज सायंकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर ‘महामुंबई वृत्तान्त’ ही नवी पुरवणीही बुधवारपासून नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरातील नागरिकांच्या भेटीस येणार आहे. राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या पुरवणीचे प्रकाशन होणार आहे. वर्धापनदिनानिमित्ताने ‘आजच्या स्त्रीच्या मर्यादा आणि भवितव्य’ या विषयावरील एका खास परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
नरिमन पॉइंट येथील ‘एक्स्प्रेस टॉवर्स’मध्ये रंगणाऱ्या या सोहळ्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. लोकसत्ता वर्धापनदिन विशेषांकाच्या अतिथी संपादक प्रसिद्ध दिग्दर्शक सई परांजपे याही यावेळी उपस्थित असतील. त्यांच्याच अध्यक्षतेखाली ‘आजच्या स्त्रीच्या मर्यादा आणि भवितव्य’ या विषयावरील परिसंवाद होईल. महिला उद्योजक अचला जोशी, डॉ. शांतिस्वरूप भटनागर पुरस्कारविजेत्या शास्त्रज्ञ डॉ. शुभा टोळे आणि खुद्द मुख्यमंत्री त्यात सहभागी होतील.
सतत बदलणाऱ्या जगात गेल्या वर्षभरात अनेक घटना, घडामोडी घडून गेल्या. त्यांची ताजी माहिती दररोजच वृत्तपत्राच्या माध्यमातून वाचकांना जाणून घेता येते. मात्र अशा स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींची नोंद आपल्या संग्रही असावी, अशी इच्छा अनेकांना असते. लेखक, पत्रकार, विश्लेषक आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अशी संकलित माहिती म्हणजे मोठा खजिनाच असतो. हीच बाब लक्षात घेऊन ‘लोकसत्ता’ ने मराठीतील पहिलीवहिली ‘वर्षवेध’ वार्षिकी तयार केली आहे.
‘वर्षवेध २०१३’ हे पुस्तक मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशित होणार असून १७ जानेवारीपासून हे पुस्तक सर्वत्र उपलब्ध होईल. हा वर्धापनदिन कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे.

असा आहे वर्षवेध
लेखक, पत्रकार, विश्लेषक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्पर्धा परीक्षांचीही तयारी करणारे उमेदवार किंवा अगदी गतवर्षांबद्दल संकलित माहिती हवी असणारे कोणालाही किती – किती उपयुक्त होईल, नाही का? हीच गोष्ट लक्षात घेऊन ‘लोकसत्ता’ने या वर्षी पहिल्यांदाच मराठीतील पहिलावहिला ‘वर्षवेध’ तयार केला आह़े

piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान
Cooking Competition in Mumbai on the occasion of Loksatta Purnabraham publication Mumbai
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ प्रकाशनानिमित्त आज मुंबईत पाककला स्पर्धा