मानेवरील शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री रुग्णालयात

मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रकृतीसंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.

मुंबई : मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले असून शुक्रवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. या कालावधीत मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार अन्य कोणाकडे सोपविण्यात येणार नाही.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रकृतीसंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. गेल्या सुमारे दोन वर्षांपासून करोनाचा मुकाबला करत आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असताना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातली विकासकामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय. मानदेखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झाले आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच. त्यामुळे या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत या दृष्टीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल होत असून दोन-तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद पाठीशी आहेत, त्यामुळे लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री असल्याचे मुख्यमंत्र्यांनी निवदेनात नमूद के ले आहे.

आपण रुग्णालयात दाखल होत असताना, करोना लशींच्या बाबतीत राज्याने १० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी सर्वांना लशींचे दोन डोस घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या अशी विनंतीही ठाकरे यांनी के ली  आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chief minister uddhav thackeray cm at the hospital for neck surgery akp

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या