मुंबई : आम्ही ३० वर्षे सापाच्या पिल्लाला दूध पाजले. तेच आता वळवळ करत आमच्यावरच फुत्कारत आहे. त्याला कसा ठेचायचे हे आम्हाला माहिती आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जहाल टीका केली. त्यावर मुख्यमंत्र्यांचे विधान जाहीरपणे केलेले नसल्याने ते नक्की काय बोलले हे स्पष्ट नाही. पण ते निराश आहे हेच अशा विधानातून दिसून येते, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या व आमदारांच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. विधिमंडळ अधिवेशनाच्या आधी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर व त्यांच्या निकटवर्तीयांवर सुरू झालेले छापे पाहता विरोधी पक्ष भाजप आक्रमक भूमिका घेणार हे स्पष्ट असल्याने सरकार त्यास कसे तोंड देणार हा प्रश्न महाविकास आघाडीच्या आमदारांना पडला आहे.

Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
bhavana gawali lok sabha marathi news
भावना गवळींची नाराजी मिटली? उद्योगमंत्र्यांनंतर मुख्यमंत्र्यांनीही….
Navneet Rana nominated for Amravati Lok Sabha Constituency
नवनीत राणा हिंदुत्वाच्या राजकारणावर स्वार
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर

देशात सध्या अत्यंत घृणास्पद राजकारण सुरू असून एक विकृती फोफावत असल्याची टीका त्यांनी भाजपवर केली. ठाकरे म्हणाले, ‘‘आम्ही ३० वर्षे सापाच्या पिल्लाला दूध पाजले. तेच आता वळवळ करत आमच्यावरच फुत्कारत आहे. त्याला कसा ठेचायचे हे आम्हाला माहिती आहे.’’