मुंबई : गोवंडी परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या एका नऊ वर्षांच्या मुलाला मंगळवारी सकाळी मुंबई महानगरपालिकेच्या कचरावाहू ट्रकने धडक दिली. या अपघातात सदर मुलाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कचरावाहू ट्रकची तोडफोड केली. शिवाजी नगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून ट्रक चालकाला अटक केली.

गोवंडीमधील बैंगनवाडी सिग्नल परिसरात मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास हा अपघात झाला. या परिसरात राहणारा हमीद (९) सकाळी ११ च्या सुमारास मदरशामधून घरी जात होता. रस्ता ओलांडत असताना अचानक भरधाव वेगात आलेल्या पालिकेच्या कचरावाहू ट्रक हमीदला धडक दिली. या अपघातात हमीदचा जागीच मृत्यू झाला.

selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Murder of woman in Hadapsar area body was kept in bed compartment
हडपसर भागात महिलेचा खून, मृतदेह पलंगातील कप्यात ठेवल्याचे उघड
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू
accident on Palm Beach Road, navi mumbai
पाम बीच मार्गावरील अपघातात एक ठार, दोन गंभीर जखमी
five year old boy dies after suffocating in car park in garage
गॅरेजमधील मोटारगाडीत श्वास कोंडल्याने पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू

हेही वाचा >>>उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचा रुग्णांना मदतीचा हात; १३ कोटी २५ लाख रुपयांचे वितरण

हमीदच्या अपघाताचे वृत्त वाऱ्याच्या वेगाने परिसरात पसरले. त्यामुळे संतप्त झालेले नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. त्यांनी कचरावाहू ट्रकची तोडफोड केली. घटनेनंतर शिवाजी नगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली जमावाला पांगवले. त्यानंतर पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. 

गेल्या काही वर्षांत या परिसरात अशाच प्रकारे अनेक अपघात झाले असून या अपघातांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. या परिसरातील बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करावी, तसेच येथे वाहतूक पोलीस तैनात करावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.