Choice of Chello Show Oscar competition breaking rules claim FWICE association ysh 95 | Loksatta

नियम डावलून ऑस्कर स्पर्धेसाठी ‘छेल्लो शो’ची निवड ?; ‘एफडब्ल्युआयसीई’संघटनेचा दावा

भारतातर्फे ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी ‘छेल्लो शो’ची निवड करताना फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड समितीने नियमांचे पालन केले नसल्याचा दावा ‘एफडब्ल्युआयसीई’ या चित्रपट संघटनेने केला आहे.

नियम डावलून ऑस्कर स्पर्धेसाठी ‘छेल्लो शो’ची निवड ?; ‘एफडब्ल्युआयसीई’संघटनेचा दावा
छेल्लो शो

मुंबई : भारतातर्फे ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी ‘छेल्लो शो’ची निवड करताना फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड समितीने नियमांचे पालन केले नसल्याचा दावा ‘एफडब्ल्युआयसीई’ या चित्रपट संघटनेने केला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एमप्लोईज या संघटनेने  ‘छेल्लो शो’च्या निवडीबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ऑस्करसाठी भारतातर्फे चित्रपट पाठवताना त्याची निर्मिती भारतीय निर्मिती संस्थेची असायला हवी. मात्र छेल्लो शो या चित्रपटाची निर्मिती ऑरेंज स्टुडिओ नामक परदेशी स्टुडिओची असून गेली काही वर्षे या चित्रपटाचा उल्लेख त्यांच्या संकेस्थळावर होता. हा चित्रपट अलिकडेच भारतात प्रदर्शित करण्यासाठी एका भारतीय वितरण कंपनीने घेतला, असा दावा संघटनेच्या पत्रकात करण्यात आला आहे. अशा पद्धतीने भविष्यात परदेशी कंपनी भारतीय निर्मिती संस्थेबरोबर संयुक्त पद्धतीने भारतीय चित्रपटाची निर्मिती करतील आणि भविष्यात त्यावर हक्क गाजवतील, अशी भीती यात व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच या चित्रपटाचा प्रीमिअर गेल्या वर्षी जूनमध्ये करण्यात आला असताना २०२२ च्या स्पर्धेसाठी हा चित्रपट निवडीस पात्र ठरतो का? यासंदर्भात फेडरेशनचे नियम काय आहेत? आणि तसा तो पात्र ठरत असेल तर तशी समान संधी त्या वर्षीच्या इतर चांगल्या चित्रपटांना मिळालेली नाही, असेही नमूद करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या पोस्टरपासून कथेपर्यंत ऑस्कर विजेत्या पॅरेडीसो चित्रपटाचा प्रभाव असल्याची चर्चा आहे. ऑस्कर समितीचे या संदर्भातील नियम कठोर असतात, तरीही हा धोका का पत्करला, असे काही प्रश्न एफडब्ल्युआयसीईचे अध्यक्ष बी. एन. तिवारी आणि अशोक पंडित यांनी उपस्थित केले आहेत. याची गंभीर दखल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
आरे कारशेडप्रकरणी मंगळवारी सुनावणी

संबंधित बातम्या

मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्प अखेर अदानी समुहाकडे; अदानीची सर्वाधिक पाच हजार कोटी रुपयांची बोली
‘न्यूक्लिअर मेडिसिन’चे जनक डॉ. रामचंद्र दत्तात्रय लेले यांचे निधन 
 ‘डीपी’वरून शिवसेना, भाजपमध्ये ठिणगी
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाला कौल
मुंबईत तिन्ही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक, लोकल उशिराने धावणार

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे: कोथरुडमधील पतसंस्थेत पावणेदहा कोटींचा अपहार; लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षाला अटक
खळबळजनक! धावत्या लक्झरी बसमध्ये आढळला रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह
पुणे: विद्यापीठ अधिसभेच्या प्राचार्य गटाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर
‘गद्दार’ वादावर पडदा, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात मनोमिलन; मुख्यमंत्री म्हणाले, “राहुल गांधींनी आम्हाला…”
Gujarat Election 2022: “स्मृती इराणींच्या प्रचारसभेला उपस्थित राहा”, शिक्षकाचा विद्यार्थ्यांना आदेश