चर्चगेट स्थानक बॉम्बने उडवू अशी धमकी देणारा निनावी फोन आल्यानंतर चर्चगेट स्थानकाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. रेल्वे पोलीस, दहशतवाद विरोधी पथक, रेल्वे सुरक्षा दलाचे पथक स्थानकाच्या परिसरात तैनात करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) हेल्पलाईनवर गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने फोन केला होता. चर्चगेट स्थानक बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी या व्यक्तीने दिली. या फोननंतर चर्चगेट स्थानकातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. चर्चगेट स्थानकाची कसून तपासणी केली जात आहे. आरपीएफ, लोहमार्ग पोलीसांची संख्याही वाढवण्यात आली आहे. आरपीएफच्या हेल्पलाईनवर कुठून फोन आला होता याचादेखील तपास सुरु आहे. मात्र या घटनेने चर्चगेट स्थानकातील प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Churchgate station security increased after bomb threat call on rpf helpline grp ats
First published on: 13-07-2017 at 13:47 IST